Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

स्पष्टपणे सांगा, की रशियाला घाबरलात..! संतापलेल्या युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘या’ संघटनेला फटकारले..

दिल्ली : युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे की, हे युद्ध (Russia Ukraine War) संपवण्यासाठी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याबरोबर कोणत्याही परिस्थितीत संवाद आवश्यक आहे. झेलेन्स्की म्हणाले, ‘मला वाटते की बैठक घेतल्याशिवाय हे समजणार नाही की युद्ध संपवण्यासाठी त्यांना नेमके काय हवे आहे. चर्चा केल्याशिवाय युद्ध संपू शकत नाही, असे झेलेन्स्की यांनी याआधी म्हटले होते.

Advertisement

रशिया आणि युक्रेनच्या प्रतिनिधींनी अनेक टप्प्यात चर्चा केली परंतु अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. हे युद्ध सुरू होऊन 27 दिवस उलटले आहेत. दरम्यान, झेलेन्स्की यांनी नाटोला (NATO) प्रश्न केला आहे, की ते युक्रेनला (Ukraine) त्यांच्या आघाडीमध्ये सामील करुन घेऊ शकतील की नाही हे स्पष्ट करावे. तसेच नाटोने आता हे देखील स्पष्टपणे सांगितले पाहिजे की त्यांना रशियाला (Russia) ते घाबरतात.

Advertisement

युक्रेनचे म्हणणे आहे की रशियाने सुमी शहराच्या बाहेरील रासायनिक संयंत्रावर बॉम्बफेक केली. सोमवारी रात्री रशियन बॉम्बफेकीमुळे प्रकल्पाध्ये अमोनिया गॅस गळती सुरू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी अनेक तास लागले. युक्रेन खोटे आरोप करत असल्याचे रशियाचे म्हणणे आहे. युक्रेनमधील रिवने येथील लष्करी प्रशिक्षण केंद्रावर हमला झाल्याचे रशियाने सांगितले.

Loading...
Advertisement

दरम्यान, युक्रेनने नाटोमध्ये सामील होण्याचा आग्रह धरला नसता आणि नाटोने आपले विस्तारवादी धोरण टाळले असते, तर हे युद्ध झालेच नसते, असे चीनने (China) स्पष्टपणे म्हटले होते. चीनचे उप परराष्ट्र मंत्री ले युचेंग यांनी एका सांगितले होते की, पूर्व युरोपमध्ये (Europe) नाटोने जे काही केले, त्याचा परिणाम युद्धाच्या रूपाने समोर आला आहे. आशिया-पॅसिफिक परिसरामध्ये अमेरिका (America) आता नाटोप्रमाणेच काम करत आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. ते म्हणाले की, अमेरिका आपल्या विस्तारवादी धोरणात वेगाने वाढ करत आहे. त्याचे परिणाम मात्र धोकादायक असतील, अशी धमकीही चीनने यानिमित्ताने दिली आहे.

Advertisement

‘त्यामुळेच’ घडलेय रशिया-युक्रेन युद्ध; चीनने केलाय खळबळजनक दावा; अमेरिकेलाही दिलीय धमकी..

Advertisement

युद्धाचे चटके..! तब्बल 1 कोटी युक्रेनी लोक आलेत रस्त्यावर.. पहा, नेमके काय घडलेय युद्धग्रस्त देशात..

Advertisement
Advertisement

Leave a Reply