Take a fresh look at your lifestyle.

खबरदार..! रशियाला मदत केली तर.. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला थेट धमकीच दिली; जाणून घ्या, काय आहे प्रकार..

दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine War) आज 24 वा दिवस आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Jo Biden) यांनी शुक्रवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या बैठकीत रशिया युक्रेन युद्ध आणि रशियावरील निर्बंधांबाबत चर्चा करण्यात आली. त्याचवेळी बायडेन यांनी रशियाला (Russia) चीनकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी थेट धमकीच चीनला दिली आहे.

Advertisement

बायडेन यांनी पुन्हा सांगितले, की की तैवानवरील अमेरिकेचे धोरण बदललेले नाही आणि सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही एकतर्फी कारवाईला अमेरिका विरोध करत राहील. दोन्ही नेत्यांनी अमेरिका आणि चीन यांच्यातील संवाद कायम सुरू ठेवण्याच्या महत्त्वावरही सहमती दर्शवली. वृत्तसंस्था शिन्हुआनुसार, जिनपिंग म्हणाले, की दोन प्रमुख देशांचे नेते म्हणून आपण जागतिक समस्या कशा व्यक्त करायच्या यावर विचार करणे आवश्यक आहे. अमेरिकेच्या या धमकीमुळे आता चीनच्या रशियाबाबतच्या धोरणात काही फरक पडतो का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

अमेरिकेने भारताबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र, भारताने सध्या तरी अमेरिकेचा विचार केल्याचे दिसत नाही. भारत आता रशियाकडून कमी दरात कच्चे तेल (Crude Oil) खरेदी करण्याची तयारी करत आहे. काही पेट्रोलियम कंपन्यांनी तर रशियन कंपन्यांना तेल खरेदीसाठी ऑर्डर दिल्याचेही समजते.

Advertisement

दरम्यान, बायडेन म्हणाले होते, की रशिया आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँक (World Bank) यांसारख्या वित्तीय संस्थांकडून निधीची मागणी करणार नाही याची खात्री करण्यासाठी G7 नेते सहमत होतील. तसेच त्यांनी रशियावर नवीन निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे आक्रमक असून त्यांना या कृत्याची किंमत द्यावी लागेल, असे अमेरिकेचे बायडेन यांनी म्हटले आहे.

Advertisement

अमेरिका रशियाकडून मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेईल, अशी घोषणा अमेरिकेच्या सभागृहाच्या अध्यक्षांनी आज पत्रकार परिषदेत केली. मे महिन्याच्या अखेरीस आम्ही 2027 पर्यंत रशियन गॅस, तेल आणि कोळशावरील आमचे अवलंबित्व संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव सादर करू, असे युरोपीय आयोगाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.

Advertisement

Russia Ukraine War : चीनच्या खेळीने अमेरिका अस्वस्थ; बायडेन थेट जिनपिंग यांना करणार फोन; पहा, नेमके काय घडले..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply