Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. कोरोनाचा फक्त एक रुग्ण सापडला अन् केले कठोर लॉकडाऊन.. पहा, कोणत्या देशाने घेतलाय निर्णय..

दिल्ली : जगात अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. चीन, दक्षिण कोरिया, ब्रिटेन या देशात कोरोना पुन्हा वेगाने वाढत चालला आहे. ओमिक्रॉनच्या एका नव्या उप प्रकारामुळे रुग्णवाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. चीनमध्ये काही शहरांत अत्यंत कठोर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. मात्र, याबाबतीत आणखी एका देशाने चीनला मागे टाकले आहे. वास्तविक फक्त तीन जरी रुग्ण सापडले तरी कठोर लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय चीनने घेतलेला आहे. मात्र, पॅसिफिक बेट राष्ट्र समोआने तर देशात कोरोनाचा फक्त एक रुग्ण सापडल्यानंतर कठोर लॉकडाऊन जाहीर केले आहे. देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे.

Advertisement

लॉकडाऊन बरोबरत या देशाने आपल्या बॉर्डरही बंद केल्या आहेत. सरकारने हवाई आणि सागरी मार्गाने सर्व आंतरराष्ट्रीय प्रवास निलंबित करण्याचा आपत्कालीन आदेश जारी केला आहे. येथे मुख्य बेटावर कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. पंतप्रधानांनी सांगितले की, कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली महिला 29 वर्षांची आहे. त्यानंतर पंतप्रधानांनी चार दिवसांच्या लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत.

Advertisement

त्यांनी गुरुवारी भाषणात सांगितले की सार्वजनिक मेळावे आणि अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांसह सर्व शाळा बंद राहतील. शुक्रवारपासून लोकांना मास्क वापरणे आणि लसीकरण कार्ड वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. समोआची लोकसंख्या 2 लाख असून येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे.

Advertisement

दरम्यान, भारतात एका दिवसात कोविड-19 चे 2,528 नवीन रुग्ण आढळल्यानंतर, देशातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 4,30,04,005 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 29,181 वर आली आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, संसर्गामुळे आणखी 149 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर देशातील मृत्यूंची संख्या 5,16,281 वर पोहोचली आहे.

Advertisement

देशात कोविड-19 वर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 29,181 वर आली आहे, जी एकूण प्रकरणांच्या 0.07 टक्के आहे. गेल्या 24 तासांत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 1,618 ने घट झाली आहे. अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत एकूण 4,24,58,543 लोक संसर्गमुक्त झाले आहेत आणि कोविड-19 मुळे मृत्यूचे प्रमाण 1.20 टक्के आहे. त्याच वेळी, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड-19 विरोधी लसींचे 180.97 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.

Advertisement

चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक..! केंद्र सरकारने राज्यांना पाठवले पत्र.. दिलेत ‘हे’ महत्वाचे आदेश..

Advertisement

कोरोना आटोक्यात..! पाकिस्तान सरकारने घेतलाय ‘हा’ मोठा निर्णय.. जाणून घ्या, काय आहे परिस्थिती..

Advertisement
Advertisement

Leave a Reply