Take a fresh look at your lifestyle.

फायदाच फायदा..! टाटाच्या ‘या’ प्लानमध्ये मिळतोय घसघशीत डिस्काउंट.. पहा, कसा मिळणार फायदा..

मुंबई : टाटा प्ले फायबर आधी टाटा स्काय ब्रॉडबँड म्हणून ओळखले जात होते. या कंपनीने आता एक भन्नाट प्लान आणला आहे. तुम्ही दीर्घकालीन योजना शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. टाटा प्ले फायबर युजर 300 एमबीपीएस प्लॅन 8400 रुपयांमध्ये मिळवू शकतात, ही किंमत सहा महिन्यांच्या योजनेसाठी आहे. यामुळे प्लॅनचा मासिक खर्च 1400 रुपयांपर्यंत कमी होतो. लक्षात ठेवा की या किंमतीत कर समाविष्ट नाही.

Advertisement

Tata Play Fiber 1 महिन्यासाठी 1500 रुपयांमध्ये 300 Mbps प्लॅन ऑफर करतो. यूजर्स हा प्लान 4500 आणि 15600 रुपयांमध्ये 3 आणि 12 महिन्यांसाठी मिळवू शकतात. या प्लॅनची ​​चांगली गोष्ट म्हणजे वापरकर्त्यांना मोफत इन्स्टॉलेशन आणि मोफत ड्युअल-बँड ओएनटी राउटरचा लाभ मिळेल. या प्लॅनसह टाटा प्ले फायबरने ऑफर केलेला डेटा एका महिन्यासाठी 3.3TB आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 3 Mbps पर्यंत कमी होईल.

Advertisement

टाटा प्ले फायबर सेवा सर्वत्र उपलब्ध नाही आणि 300 एमबीपीएस योजना देशातील प्रत्येक प्रदेशात उपलब्ध नाही. याशिवाय, जर युजर्सने मासिक प्लॅन घेतला तर त्याला इन्स्टॉलेशनवर 500 रुपये खर्च करावे लागतील. टाटा प्ले फायबरच्या या 300 Mbps प्लॅनमध्ये एकमेव गोष्ट म्हणजे ओव्हर-द-टॉप (OTT) फायद्यांचा अभाव आहे. या प्लानमध्ये कोणतेही ओटीटी फायदे मिळत नाहीत. 6 महिने आणि 12 महिन्यांच्या प्लॅनसह, युजर्स अनुक्रमे 600 आणि 2400 रुपयांची बचत करू शकतात.

Advertisement

दरम्यान, कंपनीने आणखीही काही प्लान ऑफर केले आहेत. त्यामुळे अन्य कंपन्यांचे टेन्शन वाढले आहे. या क्षेत्रात आता आधिक स्पर्धा निर्माण झाली आहे. प्रतिस्पर्धी कंपन्याही त्यानुसार प्लान लाँच करत आहेत.

Advertisement

Tata चा जोरदार धमाका..! फक्त 400 रुपयांत मिळताहेत जबरदस्त फायदे; पहा, काय आहे नवा प्लान..

Advertisement
Advertisement

Leave a Reply