Take a fresh look at your lifestyle.

होळीच्या दिवशी सोने-चांदी चमकले.. सोने खरेदीआधी जाणून घ्या काय आहेत नवीन भाव..

मुंबई : मागील काही दिवसांपासून सोन्याची दरातील घसरण सुरू आहे. आज होळी सणाच्या दिवशी मात्र सोने दरात (Gold Price) पुन्हा वाढ झाली आहे. तुम्ही जर आजच्या दिवसात सोने खरेदी करणार असाल तर सोने आणि चांदीचे बदललेले दर काय आहेत, याची माहिती असणे गरजेचे आहे. सोन्या-चांदीच्या दरात आज जोरदार उसळी पाहायला मिळाली. सोन्याचा भाव 0.85 टक्क्यांनी वाढून 51,580 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे, तर चांदीच्या दरात आज 1.62 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Advertisement

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये आज चांदीची किंमत (Silver Price) 68,394 रुपये प्रति किलो झाली आहे. गेल्या महिन्यात चांदीने 74 हजार रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला होता. दागिने बनवण्यासाठी बहुतेक फक्त 22 कॅरेटचा वापर केला जातो. काही लोक 18 कॅरेट सोने देखील वापरतात. दागिन्यांवर असलेल्या कॅरेटनुसार हॉल मार्क तयार केला जातो. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे. दुसरीकडे, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धा (Russia Ukraine War) दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाची किंमत (Crude Oil Price) कमी होत असून 100 डॉलरपर्यंत कमी झाली आहे.

Advertisement

रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील अर्थव्यवस्थेवर संकट आले असून सर्वच देश सोन्याची खरेदी जोरात करत आहेत. जगातील सर्वात मोठ्या गोल्ड-बॅक्ड एक्स्चेंज-ट्रेड (ETF) SPDR गोल्ड ट्रस्टची सोन्याचा साठा वाढून 1,067.3 टन झाला, जो मार्च 2021 नंतरचा सर्वाधिक आहे. मात्र, भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी आता सोने खरेदी करावे, असेही सांगण्यात येत आहे.

Advertisement

युद्धामुळे अनेक गुंतवणुकदारांनी गोल्ड ETF मध्ये मोठी गुंतवणूक केली, त्यामुळे सोने दरात आणखी वाढ दिसून येत आहे. रशिया आणि युक्रेनमधील (Russia Ukraine conflict) वाढत्या तणावामुळे सोने दरावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जगभरातील शेअर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणुकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले असल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या परिस्थितीत सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सोने लवकरच 60 हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

अर्र.. युद्धाच्या संकटात देशाचा सोने साठा घटला.. पहा, कशामुळे घडलाय ‘हा’ परिणाम..?

Advertisement

आहात का तयार.. कारण खिसा खाली होणार..! म्हणून सोने, पेट्रोलसह ‘त्या’ गोष्टींचा महागाई बॉंब फुटणार

Advertisement
Advertisement

Leave a Reply