दिल्ली : विदेशी कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत धोकादायक होत आहे. देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, सध्या श्रीलंकेला प्रचंड कर्ज आणि वाढत्या किमती या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अन्नधान्य आणि इंधनाची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा संयम सुटला असून ते आता सरकारच्या विरोधात आक्रमक झाले आहे. या देशात हे संकट निर्माण होण्यात चीनचेही मोठे योगदान आहे. कारण, या देशावर चीनचे अब्जावधींचे कर्ज आहे.
न्यूज एजन्सी एएफपीच्या वृत्तानुसार, श्रीलंका सध्या अत्यंत मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. संतप्त झालेल्या लोकांनी राष्ट्रपती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. न्यूज एजन्सी एएनआयने आपल्या अहवालात म्हटले आहे की, रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमती 14 वर्षांच्या सर्वाधिक पातळीवर पोहोचल्या आहेत, ज्यामुळे श्रीलंका सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.
इतकेच नाही तर या युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे देशात गव्हाचे भावही प्रचंड वाढले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, एप्रिल 2021 पर्यंत, श्रीलंकेवर $35 अब्ज डॉलरचे विदेशी कर्ज होते, ज्यामध्ये चीनचा वाटा सुमारे 10 टक्के होता. तथापि, तज्ज्ञांचे असे मत आहे, की चीनने श्रीलंकेच्या मालकीच्या उद्योगांना आणि त्याच्या मध्यवर्ती बँकेचे कर्ज घेतल्यास चीनचे एकूण कर्ज खूप जास्त असू शकते.
एएनआयने आपल्या अहवालात म्हटले आहे की, रशिया-युक्रेन युद्धामुळे श्रीलंकेच्या पर्यटनालाही फटका बसला आहे. जानेवारी 2022 मध्ये एकूण 82,327 पर्यटक आले होते, त्यापैकी जवळपास 26 टक्के पर्यटक या देशांतील होते. या संकटाच्या काळात चीननेही निराशा केली आहे. परिणामी श्रीलंका सरकार आता भारताकडून मदत मिळेले, यासाठी प्रयत्न करत आहे. श्रीलंका नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांकडून गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.
चीनच्या कृपेने श्रीलंका बेहाल..! पहा काय वाईट स्थिती झालीय शेजारी देशाची