Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Uttarakhand Election : उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्र्यांचा पराभव.. भाजपला पडलाय ‘हा’ मोठे संकट..?

दिल्ली : उत्तराखंड मध्ये कोणताही पक्ष सलग दुसऱ्यांदा सत्तेत येत नाही, असा अनुभव आहे. यावेळी मात्र भाजपने हा समज मोडीत काढला असून सरकार स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. या राज्यात भाजपने यावेळी जोरदार कामगिरी केली असली तरी काही ठिकाणी जोरदार झटकेही बसले आहे. राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Advertisement

पक्षाने मुख्यमंत्री पुष्कर धामी यांचा चेहरा समोर ठेवून निवडणूक लढली होती. मात्र धामी मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतर सातत्याने पिछाडीवर राहिले. इतकेच नाही तर काँग्रेसचे निवडणूक प्रचार प्रमुख हरीश रावत यांचाही निवडणुकीत पराभव झाला आहे. मुख्यमंत्री धामी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात 6500 पेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर होते त्यानंतर मात्र धामी निवडणुकीत पराभूत झाल्याची मोठी बातमी आली. येथून काँग्रेसचे उमेदवार भुवनचंद कापडी विजयी झाले आहेत. उत्तराखंडच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात भाजपने तीन मुख्यमंत्री दिले आणि तिसरे मुख्यमंत्री धामी होते. भाजप नेत्यांनी धामी यांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनवले होते. आता मात्र त्यांच्या पराभवाने भाजपसमोर नवे संकट उभे राहिले आहे.

Advertisement

निवडणूक निकालातील ट्रेंडला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत म्हणाले की, पुष्कर सिंह धामी यांचा पराभव आता पक्षासाठी संकट बनला आहे. त्रिवेंद्र सिंह म्हणतात की, पक्षाची एक प्रक्रिया असते, ज्या अंतर्गत मुख्यमंत्र्यांची निवड केली जाते. ते म्हणाले की, विधिमंडळ आपला नेता निवडेल आणि त्यानंतर पक्ष नेतृत्व मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करेल.

Loading...
Advertisement

त्याचवेळी आम आदमी पार्टीने उत्तराखंडच्या निवडणूक प्रचारादरम्यान निवृत्त कर्नल अजय कोथियाल यांना मुख्यमंत्री चेहरा म्हणून घोषित केले होते. परंतु त्यांचा विजय देखील कठीण दिसत आहे. गंगोत्री मतदारसंघाचे उमेदवार कोथियाल हे शर्यतीत दिसत नाहीत. भाजप उमेदवार सुरेश चौहान येथे पहिल्या क्रमांकावर आहेत. ते काँग्रेसचे उमेदवार विजयपाल सजवान यांच्यापेक्षा 6000 पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. आम आदमी पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही, तर अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील कारण उत्तराखंडमध्ये पक्षाने मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या.

Advertisement

Uttarakhand Elections : उत्तराखंडमध्ये काँग्रेसला जोरदार झटका..! मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार उमेदवाराचा पराभव..

Advertisement

LIVE Uttrakhand Assembly Election Result 2022 : उत्तराखंडने दिलाय ‘त्या’ राजकीय पक्षाला कौल

Advertisement
Advertisement

Leave a Reply