भारीच की.. स्मार्टफोन अन् इंटरनेट नाही तरीही पैसे होणार ट्रान्सफर; RBI ने सुरू केलीय ‘ही’ खास योजना; जाणून घ्या..
मुंबई : देशातील कोट्यावधी नागरिकांना भारतीय रिजर्व्ह बँकेने खुशखबर दिली आहे. आता डिजिटल पेमेंट करण्यासाठी स्मार्टफोन आणि इंटरनेटची गरज भासणार नाही. RBI ने मंगळवारी UPI आधारित पेमेंट उत्पादन लाँच केले आहे. याच्या मदतीने फिचर फोन वापरणारे लोकही सहज डिजिटल पेमेंट करू शकतील. देशात आजमितीस कोट्यावधी लोक फीचर फोन वापरतात. त्यापैकी बहुतांश ग्रामीण भागात राहणारे लोक आहेत. हे लोक जास्त किंमतीचे स्मार्टफोन खरेदी करू शकत नाहीत त्यामुळे कॉल आणि मेसेज सुविधा असलेले फीचर फोन वापरतात. असे लोक आता UPI पेमेंट देखील करू शकतील.
भारतीय रिजर्व्ह बँकेने मंगळवारी ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, अशा लोकांसाठी खास UPI सुविधा सुरू केली आहे. UPI123Pay असे या नव्या सेवेचे नाव आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गेल्या वर्षात डिसेंबरमध्ये फीचर फोनसाठी डिजिटल पेमेंट सिस्टम सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज बँकेने या सेवेची सुरुवात केली आहे. RBI ने मंगळवारी एका ट्विटमध्ये सांगितले की, RBI गव्हर्नर 8 मार्च 2022 रोजी दुपारी 12 वाजता फीचर फोनसाठी UPI123Pay सुविधा आणि डिजिटल पेमेंटसाठी 24×7 हेल्पलाइन- Digisathi लाँच करत आहेत.
फीचर फोन्समध्ये स्मार्टफोनसारखे फीचर्स नसतात. हे अत्यंत कमी किमतीत बाजारात उपलब्ध आहेत. फीचर फोनमध्ये कॉल आणि टेक्स्ट मेसेज करण्याची सुविधा आहे. RBI गव्हर्नर म्हणाले होते की, देशातील आर्थिक सुविधांचा आवाका वाढ करण्यासाठी फीचर फोन वापरकर्त्यांना डिजिटल पेमेंटच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे.
TRAI च्या ऑक्टोबर 2021 च्या आकडेवारीनुसार, देशात 118 कोटी मोबाईल फोन युजर्स आहेत. यामध्ये काही जण अजूनही फीचर फोन वापरतात. देशात 74 कोटी स्मार्टफोन युजर्स आहेत. उर्वरित 44 कोटी फीचर फोन युजर्स डिजिटल पेमेंटचा पर्याय वापरू शकत नाहीत. या UPI123Pay सुविधेद्वारे फीचर फोन युजर्स स्मार्टफोन युजर्सप्रमाणेच डिजिटल पेमेंट करू शकतील. या सुविधेमुळे युजर्स अगदी कमी रक्कम सहज पेमेंट करू शकतील.
आता इंटरनेट नसले तरीही पैसे होतील ट्रान्सफर; Paytm ने सुरू केलीय ‘ही’ खास योजना; जाणून घ्या..