Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. तर कच्च्या तेलाच्या किंमती होतील 300 डॉलर पार; संतापलेल्या रशियाने युरोपिय देशांना दिलाय ‘हा’ गंभीर इशारा..

दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्धा दरम्यान संतापलेल्या रशियाने पाश्चिमात्य देशांना एक गंभीर इशारा दिला आहे. कच्च्या तेलाच्या किंमती तब्बल 300 डॉलर पर्यंत पोहोचतील, असा इशारा रशियाने दिला आहे. जर असे घडले तर याचा मोठा फटका युरोपमधील देशांना बसणार आहे. कारण, युरोपिय देश रशियाकडून मोठ्या तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करतात. अशा परिस्थितीत या देशांनी अमेरिकेच्या दबावाखाली रशियन तेलावर निर्बंध टाकण्याचा विचार सुरू केला आहे. त्यानंतर रशियाने हा इशारा दिला आहे.

Advertisement

एका वरिष्ठ रशियन मंत्र्याने सोमवारी सांगितले, की पाश्चात्य देशांना तेलाच्या किंमती प्रति बॅरल $300 पेक्षा जास्त आणि रशिया-जर्मनी गॅस पाइपलाइन बंद होण्याचा सामना करावा लागू शकतो. अमेरिका आणि युरोपिय मित्र राष्ट्रे रशियन तेल आयातीवर निर्बंध लादण्याचा विचार करत असताना तेलाच्या किमती 2008 नंतरच्या सर्वोच्च पातळीवर गेल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी सोमवारी सांगितले. कच्च्या तेलाची ही 14 वर्षांतील सर्वाधिक आहे.

Advertisement

रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक यांनी सरकारी टेलिव्हिजनवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “हे अगदी स्पष्ट आहे की रशियन तेल नाकारल्याने जागतिक बाजारपेठेवर घातक परिणाम होतील. किंमतींमध्ये अनपेक्षित वाढ होईल. रशियाकडून मिळणारे तेल बदलण्यासाठी युरोपला एक वर्षाहून अधिक काळ लागेल आणि खूप जास्त किंमत द्यावी लागेल, असे नोवाक म्हणाले.

Advertisement

जर तुम्हाला रशियाकडून ऊर्जा पुरवठा नाकारायचा असेल तर त्यानुसार कार्यवाही करा. यासाठी आम्ही तयार आहोत. रशिया, जो युरोपला 40% वायूचा पुरवठा करतो, तो आपली जबाबदारी पूर्णत: पार पाडत आहे. मात्र, हे पूर्णतः युरोपियन युनियनला आपल्या अधिकारात प्रत्युत्तर देणे असेल. कारण, याआधी जर्मनीने नॉर्ड स्ट्रीम 2 गॅस पाइपलाइन प्रमाणीकर रोखले होते.

Advertisement

“Nord Stream 2 वर बंदी घालण्याच्या संदर्भात, आम्हाला एक निर्णय घेण्याचा आणि Nord Stream 1 गॅस पाइपलाइनद्वारे बंदी टाकण्याचा पूर्ण अधिकार आहे. आतापर्यंत आम्ही असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण, युरोपातील राजकारणी रशिया विरोधात सातत्याने जी वक्तव्ये करत आहेत, त्यामुळे आम्हाला त्या मार्गाने कारवाई करण्यासाठी भाग पाडत आहेत, असेही नोव्हाक यांनी सांगितले.

Advertisement

Russia-Ukraine War : रशियन तेलाचे मार्केट होणार डाऊन.. ? ; पहा, अमेरिका आणि युरोपिय देशांचा काय आहे प्लान..?

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply