Russia-Ukraine War : .. तर युरोप सुद्धा टिकणार नाही; युक्रेनच्या राष्ट्राध्यांनी अवघ्या युरोपला दिलाय ‘हा’ गंभीर इशारा..
दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धा अजूनही सुरुच आहे. या दहा दिवसांच्या काळात रशियाने युक्रेनचे अतोनात नुकसान केले आहे. शहरे उद्धवस्त केली आहेत. लाखो लोकांना दुसऱ्या देशात आश्रय घेणे भाग पडले आहे. इतके नुकसान झाल्यानंतरही युद्ध थांबलेले नाही. युक्रेननेही माघार घेतलेली नाही. या संकटाच्या काळातच आता युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी संपूर्ण युरोपलाच निर्वाणीचा इशारा दिला आहे.
राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले, की जर युक्रेन टिकले नाही तर संपूर्ण युरोप टिकणार नाही. अध्यक्ष झेलेन्स्की यांनी आंदोलकांना सांगितले, की ‘गप्प बसू नका. रस्त्यावर उतरा युक्रेनला पाठिंबा द्या. आमच्या स्वातंत्र्याचे समर्थन करा. हा केवळ रशियन सैन्यावरचा विजय नसेल तर अंधारावर प्रकाशाचा विजय असेल. वाईटावर चांगल्याचा विजय होईल.
झेलेन्स्की पुढे म्हणाले, की “जर युक्रेन युद्धात फसले तर संपूर्ण युरोप डळमळीत होईल आणि जर आपण या युद्धात जिंकलो तर हा लोकशाहीचा मोठा विजय असेल, आपल्या मूल्यांसाठी स्वातंत्र्याचा विजय असेल.” माझा माझ्या लोकांवर विश्वास आहे, माझा तुमच्यावर विश्वास आहे. याआधी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाटोला त्यांच्या देशावरील हवाई क्षेत्र ‘नो-फ्लाय झोन’ म्हणून घोषित करण्याची विनंती केली होती.
नाटोचे म्हणणे आहे की ‘नो फ्लाय झोन’ घोषित करून, सर्व अनधिकृत विमानांना युक्रेनवर बंदी घातली जाईल. त्यामुळे अण्वस्त्रांनी सज्ज रशियासोबत युरोपीय देशांचे मोठ्या प्रमाणावर युद्ध होणार आहे. त्यामुळे नाटो देशांनी अद्याप असा निर्णय घेतलेला नाही.
त्याचवेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारी पुन्हा एकदा धमकी दिली आहे. ब्रिटेनच्या एका मंत्र्याच्या हवाल्याने पुतिन यांनी नाटोला धमकी दिली आहे. ते म्हणाले की नाटो युद्धात सामील होऊ शकते. त्याचवेळी रशियाचे अध्यक्ष पुतिन म्हणाले की, युक्रेनला ‘नो फ्लाय झोन’ घोषित करणे म्हणजे युद्धाच्या घोषणेसारखे आहे. याआधी नाटोने युक्रेनला ‘नो फ्लाय झोन’ म्हणून घोषित करू शकते असे म्हटले होते.