Take a fresh look at your lifestyle.

रशिया-युक्रेन युद्धाचा इफेक्ट..! घरगुती गॅसच्या बाबतीत व्यक्त होतोय ‘हा’ अंदाज; वाचा, महत्वाची माहिती..

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलनंतर आता एलपीजीही ग्राहकांना धक्का देणार आहे. महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्यांसाठी घरगुती गॅस टाकी खर्चिक होऊ शकते. तसेही आता व्यावसायिक गॅस टाकीच्या दरात वाढ झाली आहे. त्यानंतर आता घरगुती गॅस टाकीच्या दरातही वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तेल कंपन्यांना सातत्याने होत असलेले नुकसान पाहता 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर घरगुती गॅस टाकीच्या दरात वाढ होऊ शकते. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Commercial gas cylinder) किमती 1 मार्चपासून 105 रुपयांनी वाढल्या आहेत.

Advertisement

खरं तर, रशिया-युक्रेन युद्धानंतर (Russia-Ukraine War) कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पाहता, तेल कंपन्या आता व्यावसायिक गॅसनंतर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढ करण्याची शक्यता आहे. सध्या 5 किलो एलपीजी टाकीच्या दरातही 27 रुपयांनी वाढ झाली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर घरगुती गॅस टाकीबरोबरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

1 मार्चपासून वाढलेल्या किमतीनुसार, राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1907 रुपयांवरुन 2012 रुपये झाली आहे. 5 किलोग्रॅमच्या गॅस टाकीची किंमत 27 रुपयांनी वाढून 569.5 रुपये झाली आहे. कंपन्यांनी घरगुती गॅस टाकीच्या दरात सध्यातरी कोणताही बदल केलेला नाही. घरगुती गॅस टाकीचे दर 6 ऑक्टोबर 2021 पासून स्थिर आहेत. मात्र निवडणुकीनंतर (Election) हे दर वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement

दरम्यान, देशात गेल्या 119 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किंमती मात्र प्रचंड वाढल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्या तरी देशात इंधनाचे भाव स्थिर आहेत. याचे महत्वाचे कारण 5 राज्यांतील विधानसभा निवडणुका आहेत, असे सांगण्यात येत आहे. मात्र, आता या निवडणुका अंतिम टप्प्यात आहेत. 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत. त्यानंतर इंधनाच्या दरात मोठी वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण, तेल कंपन्यांना होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी सध्या तरी हाच मार्ग दिसत आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर किंमती वाढतात का, वाढल्या तर कितीने वाढतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

Ukraine-Russia War Effect : बाब्बो.. व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून मिळणार इतक्या रुपयांना

Advertisement
Advertisement

Leave a Reply