Take a fresh look at your lifestyle.

अमेरिका चीनला मोठा झटका देण्याच्या तयारीत..! पहा, चीनच्या विरोधात कोणता नवा प्रस्ताव आलाय..?

दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धा दरम्यान तैवान धोक्यात आला आहे. चीन रशिया प्रमाणेच कारवाई करुन तैवानवर कब्जा करेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसा अंदाजही व्यक्त होत असल्याने अमेरिकेने नवीन प्लान तयार करण्यास सुरुवात केली आहे. चीनने तैवानवर आक्रमण केले तर चीनवर आर्थिक निर्बंध टाकणारे विधेयक तीन अमेरिकन खासदारांनी मांडले आहे. सिनेट सदस्य रिक स्कॉट आणि अमेरिकन संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील इतर दोन सदस्यांनी आर्थिक निर्बंध कायद्याद्वारे चीनच्या आक्रमकतेला आळा घालण्यासाठी एक विधेयक सादर केले आहे. चीनचा तैवानबाबत आक्रमक दृष्टिकोन वाढला असतानाच हा प्रस्ताव आणण्यात आला आहे.

Advertisement

रशियाने युक्रेनवर केलेल्या हमल्याप्रमाणेच चीन तैवान आणि दक्षिण चीन समुद्रातही आपले लष्करी सामर्थ्य दाखवू शकतो, अशी भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. चीन या बेटाचा परिसर स्वतःचा मानतो आणि बळजबरीने तो ताब्यात घेण्याची धमकीही दिली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ म्हणाले की, अमेरिकेने तैवानला एक देश म्हणून औपचारिकपणे मान्यता दिली पाहिजे. अमेरिकेने 1979 मध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाला मान्यता दिल्यावर तैवान बरोबरील औपचारिक राजनैतिक संबंध तोडले होते. तैवानचे अधिकृत नाव रिपब्लिक ऑफ चायना आहे.

Advertisement

तैवानला 100 दशलक्ष डॉलर्सच्या शस्त्रास्त्र पुरवठ्याबाबत चीनने याआधी अमेरिकेला इशारा दिला होता. चीन आपल्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आवश्यक पावले उचलेल, असे चीनने म्हटले होते. अमेरिकेने स्वशासित बेटाद्वारे वापरल्या जाणार्‍या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली ‘सुरू ठेवण्यासाठी’ आणि ‘सुधारणा’ करण्यासाठी तैवानला संभाव्य 100 दशलक्ष उपकरणांच्या विक्रीसाठी मंजुरी दिली आहे.

Advertisement

दरम्यान, तैवानच्या अमेरिके बरोबरच्या वाढत्या सहकार्यामुळे चीन चांगलाच अस्वस्थ झाला आहे. चीन तैवानवर आपला अधिकार सांगत आहे, जरी तैवानचे लोक यावर विश्वास ठेवत नाहीत. अलिकडच्या काही महिन्यांत चीनने तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात शेकडो लढाऊ विमाने पाठवली आहेत. तसेच चीन तैवान विरोधात आपली लष्करी तयारी तीव्र करत आहे.

Advertisement

अमेरिकी अधिकाऱ्यांच्या तैवान दौऱ्याबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी म्हटले आहे की, चीनचे लोक राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहेत. तैवानला पाठिंबा दर्शविण्याचा अमेरिकेचा कोणताही प्रयत्न व्यर्थ ठरेल. चीनने अमेरिकेला एक चीन तत्त्वाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

Russia-Ukraine War : आता पाकिस्तानही चीनच्या मार्गावर; पहा, रशियाच्या मदतीसाठी चीन-पाकिस्तानने काय केलेय..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply