Take a fresh look at your lifestyle.

Corona Update : देशात कोरोनाचे रुग्ण पु्न्हा वाढले.. पहा, 24 तासात किती नवे रुग्ण सापडले..?

मुंबई : देशात आज घातक कोरोना विषाणूच्या साथीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 7 हजार 554 नवीन रुग्ण आढळले असून 223 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 6915 प्रकरणे आणि 180 मृत्यूची नोंद झाली होती. म्हणजेच कालच्या तुलनेत आज रुग्ण वाढले आहेत.

Advertisement

ताज्या प्रकरणांनंतर, एकूण प्रकरणे 42,938,599 वर गेली आहेत. देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 85,680 आहे. गेल्या 24 तासांत त्यात 0.20 टक्के घट झाली आहे. गेल्या एका दिवसात 14,123 लोक या आजारातून बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 42,338,673 लोक बरे झाले आहेत. रिकव्हरी दर 98.60 वर गेला आहे. 223 नवीन मृत्यूंसह, कोविडमुळे देशातील एकूण मृत्यूंची संख्या 514,246 वर गेली आहे. गेल्या 24 तासांत 8,55,862 लसीकरण झाले आहे. त्याच वेळी, आतापर्यंत एकूण 1,77,79,92,977 लसीकरण करण्यात आले आहे. कालच्या तुलनेत आज 9.2 टक्के जास्त रुग्ण आढळले आहेत.

Advertisement

मंगळवारी दिल्लीत आणखी 344 रुग्ण आढळून आले आणि चार रुग्णांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, संसर्ग दर 0.80 टक्के होता. राष्ट्रीय राजधानीत एकूण प्रकरणे 18,60,236 वर पोहोचली आहेत आणि मृत्यूंची संख्या 26,126 वर पोहोचली आहे. एका दिवसाआधी शहरात 42,947 नमुने तपासण्यात आल्याचे सांगण्यात आले. सोमवारी दिल्लीत कोविडची 258 प्रकरणे आढळून आली होती आणि एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही तर संसर्ग दर 0.71 टक्के होता.

Advertisement

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कमी होत असलेला कोरोनाचा वेग पुन्हा वाढला आहे. राज्यात गेल्या 24 तासांत ओमिक्रॉनचे 104 नवीन रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये 41 प्रकरणे फक्त पुण्यातील आहेत. तसेच कोरोना विषाणू (COVID-19 Pandemic) संसर्गाची 675 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर एकूण रुग्णांची संख्या 78,66,380 वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.

Advertisement

विभागाने सांगितले की, आणखी 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूंची संख्या 1,43,706 वर पोहोचली आहे. विभागानुसार, गेल्या 24 तासांत 1,225 लोक संसर्गमुक्त झाल्यानंतर, बरे झालेल्या लोकांची एकूण संख्या 77,12,568 झाली आहे. राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 6,106 आहे.

Advertisement

कोरोनाच्या संकटातही जोरदार कार खरेदी..! पहा, फेब्रुवारी महिन्यात कार कंपन्यांनी किती कार विक्री केली..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply