Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine War : .. तर रशियाही लवकरच होईल कंगाल; पहा, रशियाने युद्धासाठी किती पैसा खर्च केलाय..?

दिल्ली : युक्रेनवर रशियन आक्रमणाचा खरा उद्देश युक्रेनला नाटोमध्ये सहभागी होण्यापासून रोखणे हा होता. परंतु जर हे युद्ध दीर्घकाळ चालले तर रशियाचे मोठेच नुकसान होण्याची शक्यता आहे. शेजारील देशाचे माजी संरक्षण मंत्री रिहो तेरस यांनी दावा केला आहे, की जर युद्ध 10 दिवसांपेक्षा जास्त काळ चालले तर रशिया गरिबीच्या उंबरठ्यावर पोहोचेल. पुतिन यांना वाटाघाटी करण्यास भाग पाडले जाईल. युक्रेनवर लवकर ताबा मिळवण्याबाबत रशियाचा गैरसमज होता.

Advertisement

रशियासमोर सध्या एकाच वेळी अनेक आघाड्यांवर आव्हान आहे. या युद्धावर दररोज 1.12 लाख कोटी रुपये खर्च होत असताना, रशियाचे चलन रूबल या महिन्यात 10 टक्क्यांनी कमकुवत झाले आहे. पाश्चात्य देशांनी रशियाबरोबर डॉलर-युरो-पाऊंडच्या व्यापारावर बंदी घातली आहे. अशा स्थितीत रुबल आणखी घसरू शकतो. युद्ध सुरू होण्याच्या तीन आठवड्यांआधी रशियन कंपन्यांना त्रास होऊ लागला होता. तेथील शेअर बाजार 10 फेब्रुवारीपासून 40 टक्क्यांनी घसरला आहे. यामुळे रशियाच्या कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. युक्रेनवरील आक्रमणाच्या अवघ्या 4 दिवसांत रशियाला 5 लाख कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत.

Advertisement

एका गुप्तचर अहवालानुसार, युक्रेनवरील आक्रमणानंतरही पुतिन युरोपमध्ये थांबणार नाहीत. NATO मध्ये सामील होण्याच्या विचारात असलेल्या स्वीडन या शेजारी देशांवरही रशिया आक्रमण करू शकतो. दुसरीकडे, युरोप आणि अमेरिकेने लादलेल्या वेगवेगळ्या आर्थिक निर्बंधांमुळे रशियन अर्थव्यवस्थेला धक्का बसू लागला आहे.

Advertisement

रशियाची आघाडीची इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर कंपनी DNS चे चीफ एक्झिक्युटिव्ह दिमित्री अलेक्सिएव्ह म्हणाले की ‘हे युद्ध आम्हाला मागे ढकलेल. युद्धाची गरज काय होती हे समजत नाही” त्याचप्रमाणे दुसऱ्या क्रमांकाची रशियन एअरलाइन S7, ज्याला फ्लाइट बंदीचा फटका बसणार आहे, ती कंपनी गरिबीकडे जाऊ शकते, असे म्हटले आहे.

Advertisement

अमेरिकन संरक्षण तज्ज्ञांचा असा विश्वास आहे, की जर हे युद्ध एक महिनाही चालले तर रशियाचा फायदा फारच कमी आणि तोटा खूप जास्त होईल. कीव आणि खार्किवमध्ये युक्रेनची आघाडी मजबूत ठेवण्यासाठी काही युरोपीय देशांनी युक्रेनला शस्त्रपुरवठा सुरू केला आहे. वास्तविक आता रशियाला दीर्घकाळ युद्धात गुंतवून ठेवण्याचे युरोपीय देशांचे उद्दिष्ट आहे. दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रविवारी बदललेली परिस्थिती पाहता राखीव दलाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

Loading...
Advertisement

रशियन आक्रमणाचा सामना करण्यासाठी युरोपीय देशांमधील सरकारबरोबरच सामान्य लोकही युक्रेनला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. युक्रेनची बँक ‘नॅशनल बँक ऑफ युक्रेन’ (NBU) ने 4 दिवसांआधी मदतीसाठी खास बँक खाते उघडले. NBU च्या मल्टीकरन्सी खात्यात अवघ्या चार दिवसांत 1 अब्जाहून अधिक पैसे जमा झाले आहेत.

Advertisement

आता लष्कर यातून दारूगोळा, दळणवळण वस्तू आणि गणवेश खरेदी करणार आहे. युक्रेनसाठी उभारण्यात येणारी मदत युक्रेनच्या लष्कराला त्यांच्या दूतावासाद्वारे पाठवली जात आहे. चेक रिपब्लिकमध्ये दोन ठिकाणी हे साहित्य जमा केले जात आहे. जिथे लोक जीवनावश्यक वस्तू देत आहेत. मंत्री परिषद, प्रागमधील युक्रेनचे संरक्षण कार्यालय देखील यामध्ये मदत करत आहे.

Advertisement

Russia-Ukraine War : रशिया विरोधात आता ‘गुगल’ ही मैदानात..! रशियाची ‘अशी’ करणार आर्थिक नाकेबंदी..

Advertisement

Russia-Ukraine War : .. तरीही युक्रेनने रशियाला दिलाय ‘हा’ गंभीर इशारा; युरोपियन युनियनकडे केलीय मोठी मागणी..

Advertisement
Advertisement

Leave a Reply