दिल्ली : युक्रेन विरुद्ध युद्धाचा आज चौथा दिवस आहे. या चार दिवसात रशियाने युक्रेनचे अतोनात नुकसान केले आहे. युक्रेनच्या अनेक शहरांवर कब्जा केला आहे. लाखो लोकांना दुसऱ्या देशात आश्रय घेणे भाग पडले आहे. इतके सगळे घडून गेल्यानंतर आता काही देश युक्रेनच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. काल अमेरिकेने युक्रेनला शस्त्रात्र खरेदीसाठी 350 दशलक्ष डॉलर्स देण्याची घोषणा केली. त्यानंतर आता युरोपियन देश जर्मनीनेही मोठी घोषणा केली आहे.
जर्मन सरकारने युक्रेनला थेट शस्त्रे आणि इतर वस्तू पाठवणार असल्याचे सांगितले. जर्मनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशियासाठी ‘स्विफ्ट’ जागतिक बँकिंग प्रणालीच्या निर्बंधांना जर्मनी पाठिंबा देण्यासही तयार आहे. जर्मन अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांचा देश रशियन विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद करण्याच्या तयारीत आहे. परिवहन मंत्र्यांनी अशा कारवाईचे समर्थन केले आणि त्यासाठी सर्व तयारी करण्याचे आदेश दिले.
जर्मनीच्या चान्सलर कार्यालयाने युक्रेनला 1,000 अँटी-टँक शस्त्रे आणि 500 हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे “लवकरात लवकर” पाठवण्याची घोषणा केली. रशियाचा युक्रेनवरील हमला हा एक टर्निंग पॉइंट असल्याचे जर्मनीचे चान्सलर यांनी सांगितले. युद्धानंतर यंत्रणा धोक्यात येईल. अशा परिस्थितीत व्लादिमीर पुतिन यांच्या सैन्याविरुद्ध सर्व शक्तीनिशी युक्रेनला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.
याआधी जर्मनीच्या आर्थिक आणि हवामान मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले होते की, जर्मनी युक्रेनला 400 जर्मन बनावटीची अँटी-टँक शस्त्रे पाठवण्याची परवानगी देत आहे. विशेष म्हणजे जर्मनीचे हा निर्णय विलक्षण आहे कारण युद्धक्षेत्रात प्राणघातक शस्त्रे निर्यात न करण्याचे त्यांचे धोरण आहे. नुकतेच शुक्रवारी सरकारी अधिकाऱ्यांनी या धोरणाचे पालन करणार असल्याचे सांगितले होते. परंतु युरोपियन युनियनच्या 27 सदस्यांचा एक भाग असलेल्या जर्मनीवर युक्रेनियन अधिकारी आणि इतर मित्र राष्ट्रांनी मदत न केल्याबद्दल टीका केली होती.
रशिया विरोधात युक्रेनचा मोठा निर्णय; रशियाला रोखण्यासाठी ‘येथे’ केलीय तक्रार; जाणून घ्या..