Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

नगर जिल्ह्यातील ‘या’ कारखान्यात भीषण स्फोट, मोठ्या प्रमाणात नुकसान..!

अहमदनगर : श्रीगोंदे तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यात गुरुवारी (ता. 11) पहाटे मोठा स्फोट झाला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी सुमारे साडे चार कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नागवडे कारखान्याच्या अर्कशाळा विभागातील मळी साठवण टाकीचे तापमान वाढून हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येते. टाकी फुटल्याने जवळपास 4 हजार टन मळी वाहून गेली. टाकीचा स्फोट एवढा भीषण होता, की त्याने शेजारची संरक्षक भिंत पडली. तसेच संपूर्ण परिसर या स्फोटाने हादरला.

Advertisement

सध्या नागवडे कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. कारखान्यात साखरेसह उपपदार्थ तयार केले जातात. कारखान्याच्या अर्कशाळा विभागातील टाक्यांमध्ये मळी साठविण्यात येते. गुरुवारी पहाटे अर्कशाळेतील टाकीच्या आतील तापमान मोठ्या प्रमाणात वाढल्याने हा स्फोट झाला. त्यात ही टाकी फुटली. या टाकीची साठवण क्षमता साडे चार हजार टन असून, तीत 4 हजार 100 टन मळी साठविली होती. टाकी फुटल्याने सगळी मळी वाहून गेली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शेजारची संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेत कारखान्याचे सुमारे साडे चार कोटींचे नुकसान झाले.

Advertisement

याबाबत माहिती मिळताच, कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. शेजारच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले. कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, सचिव बापूराव नागवडे, अर्कशाळा विभागप्रमुख बबनराव गोरे, सुरक्षा अधिकारी बाळासाहेब लगड यांनी घटनास्थळाची पाहणी केली. कारखाना प्रशासनाने उत्पादनशुल्क विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.

Loading...
Advertisement

दरम्यान, कारखान्याचे सचिव बापूराव नागवडे म्हणाले, की पहाटे ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला. त्या परिसरात कामगार अथवा आजूबाजूला लोक नव्हते. या घटनेबाबत कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी तातडीने सूचना दिल्या आहेत.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून नागवडे सहकारी कारखाना जिल्ह्यात चर्चेचा विषय राहिला आहे. या कारखान्याची काही दिवसांपूर्वीच निवडणूक झाली होती. त्यात राजेंद्र नागवडे यांच्या पॅनेलने दणदणीत विजय मिळवताना पाचपुते गटाचा एकतर्फी पराभव केला होता. नागवडे कारखान्यातील सत्ता राखण्यात राजेंद्र नागवडे यांना यश आले. त्यानंतर या स्फोटामुळे पुन्हा एकदा हा कारखाना चर्चेत आला आहे.

Advertisement

रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर, रेपो दराबाबत घेतला मोठा निर्णय..!
अर्र.. चीनच्या ‘त्या’ धोरणाने जगच आलेय संकटात.. पहा, जागतिक अर्थव्यवस्थेवर ‘कसा’ होतोय इफेक्ट

Advertisement
Advertisement

Leave a Reply