मुंबई : रिझर्व्ह बँकेने गुरुवारी (ता. 10) आपले दहावे पतधोरण जाहीर केले.. त्यात रेपो दरात कोणताही बदल न करता, तो 4 टक्के इतका कायम ठेवला आहे, तर रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के ठेवला आहे. महागाई दर व कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती पाहता, देशांतर्गत चलनवाढीच्या स्थितीबाबत मध्यवर्ती बॅंकेच्या आकलनाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते. ‘आरबीआय’कडून रिर्व्हस रेपो दरात बदल केले जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, तसे झालेले नाही..
‘आरबीआय’चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज (गुरुवारी) पतधोरण जाहीर केले. त्यानुसार रेपो दर 4 टक्के, तर रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. दास म्हणाले, की “जागतिक बाजारपेठेत कोरोनामुळे अनेक आव्हाने निर्माण झाली, भारतालाही अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. त्यात ‘आरबीआय’ने मोठी भूमिका बजावली आहे. आता कोरोना पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी आपण अधिक चांगल्या स्थितीत आहोत.”
रिझर्व्ह बँकेने डिसेंबर-2021 मध्ये नववे पतधोरण जाहीर केले होते. त्यावेळी सलग नवव्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नव्हता. रिझर्व्ह बँकेने मॉनिटरी पॉलिसीमध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. रेपो रेट 4 टक्क्यांवर कायम ठेवला होता. बाजारात रोकड सुलभता राहावी, म्हणून बँकेकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. या काळात पतधोरणातील प्रमुख व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले होते.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांत घाऊक आणि किरकोळ बाजारात महागाईचा भडका उडालाय. अमेरिकेतही महागाईने 40 वर्षांचा उच्चांक गाठलाय. तेथील केंद्रीय बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हने बॉण्ड खरेदी आटोपती घेऊन व्याजदर वाढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्याचेच अनुकरण रिझर्व्ह बँकेकडून केले जाणार असल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली होती. मात्र, ‘आरबीआय’ने सध्या तरी पतधोरणात काहीही बदल केलेला नाही..
रेपो रेट म्हणजे..
‘रेपो रेट’ म्हणजे रिझर्व बँकेकडून ज्या दराने बँका पैसा घेतात, तो दर. रेपो रेट वाढल्यास बँकांना रिझर्व बँकेकडून जादा दराने कर्ज घ्यावे लागते.. रेपो रेट कमी झाल्यास बँकेला स्वस्तात पैसे मिळतात. ‘आरबीआय’ने रेपो रेट वाढवल्यास बँकांही ग्राहकांच्या कर्जाचे दर वाढवितात.
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे..
‘रिव्हर्स रेपो रेट’ म्हणजे रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्ज रूपाने पैसे घेते. त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला ‘रिव्हर्स रेपो रेट’ म्हणतात.
फायदाच फायदा..! Jio च्या ‘या’ रिचार्ज प्लान्सवर मिळतोय 200 रुपयांचा कॅशबॅक; चेक करा, डिटेल..
इकडे लक्ष द्या रे.. ‘त्या’ शेअरवर ठेवा की लक्ष; नाहीतर कमावणे कमी अन गमावणे होईल फास्ट..!