Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजारात तेजी कायम, केंद्राच्या बजेटवर गुंतवणूदार खूश..

मुंबई : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा दिलेला नसल्याने शेअर बाजारात त्याचे काय पडसाद उमटतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.. मात्र, मंगळवारी (ता. 1) अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार तेजी आल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आज (बुधवार) सकाळची सुरुवात ही चांगली झाली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने 500 अंकांची झेप घेतली, तर निफ्टी 150 अंकांनी वधारला. बजेटमध्ये सर्वसामान्यांची घोर निराशा झाली असली, तरी गुंतवणूकदार मात्र त्यावर खूश असल्याचे त्यावरुन दिसते. पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठी केलेली भक्कम भांडवली गुंतवणुकीची तरतूद आणि अर्थचक्राला बळ दिल्याने बाजारात तेजीचे वातावरण असल्याचे पाहायला मिळाले..

Advertisement

अर्थसंकल्पात तूट किंचित वाढणार असली, तरी विकासदराबाबत आश्वासक अंदाज व्यक्त केला आहे. दरमहा वाढणारे ‘जीएसटी’ कर संकलन सरकारसाठी जमेची बाजू असल्याने अर्थव्यवस्था वेगाने वाढेल, असा विश्वास गुंतवणूकदारांना आहे. त्यामुळेच बाजारात खरेदीचा उत्साह दिसून आला..

Advertisement

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने आज पुन्हा एकदा 17700 अंकांची पातळी ओलांडली. सध्या निफ्टी 161 अंकांनी वाढला असून, सध्या तो 17738 अंकांवर ट्रेड करीत आहे. सेन्सेक्स 546 अंकांनी वधारला असून, तो 59409 अंकावर आहे. निफ्टी बँकमध्ये 1.12 टक्के वाढ झाली असून, तो 38938 अंकांवर आहे. व्होडाफोन, स्टील ऑथारिटी, आयटीसी, जीएमआर, पीएनबी बँक, येस बँक, टाटा पॉवर, बँक ऑफ बडोदा, भेल, इंडियन हॉटेल या शेअरमध्ये वाढ झाली.

Loading...
Advertisement

इन्फ्रा, बँका, वित्त संस्था, एफएमसीजी, फार्मा, मेटल क्षेत्रात खरेदीचा ओघ आहे. मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर 30 पैकी 27 शेअर तेजीत आहेत. त्यात आयटीसी, कोटक बँक, बजाज फायनान्स, पॉवरग्रीड, एचसीएल टेक, ऍक्सिस बँक, इंडस इंड बँक, एसबीआय, विप्रो, टायटन, नेस्ले, टीसीएस, रिलायन्स, डॉ. रेड्डी लॅब, एचयूएल या शेअरमध्ये वाढ झाली. अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा या शेअरमध्ये घसरण दिसून आली.

Advertisement

.. म्हणून युरोपातील देशांनी ‘WTO’ कडे केलीय चीन विरोधात तक्रार; पहा, चीनमुळे कोणत्या संकटात सापडलेत हे देश..?
हेल्थ टिप्स : वजन कमी करण्याच्या प्रयत्नात तुम्हीही अशा चुका तर करत नाही ना.. फायद्याऐवजी होऊ शकतो तोटा

Advertisement
Advertisement

Leave a Reply