Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बजेटच्या आधी मोदी सरकारसाठी खुशखबर..! ‘GST’ ने एकाच महिन्यात केलेय मालामाल; पहा, किती मिळालाय महसूल..?

दिल्ली : केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 31 जानेवारी रोजी जानेवारी महिन्यातील जीएसटी संकलनाची आकडेवारी जाहीर केली आहे. जानेवारी 2022 साठी एकूण GST महसूल 1,38,394 कोटी रुपये जमा झाले आहेत. विशेष म्हणजे, जीएसटी संकलन 1.30 लाख कोटींच्या पुढे गेल्याची ही चौथी वेळ आहे.

Advertisement

जानेवारी 2022 चा महसूल मागील वर्षाच्या याच महिन्यातील GST महसुलापेक्षा 15 टक्के अधिक आहे आणि जानेवारी 2020 मधील GST महसुलापेक्षा 25 टक्के अधिक आहे. जानेवारी 2022 च्या महिन्यासाठी एकूण GST महसूल 1,38,394 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये CGST 24,674 कोटी रुपये, SGST 32,016 कोटी रुपये, IGST 72,030 कोटी रुपये समावेश आहे. एप्रिल 2021 मध्ये सर्वाधिक मासिक GST संकलन 1,39,708 कोटी रुपये होते. 30 जानेवारी 2022 पर्यंत दाखल केलेल्या GSTR-3B रिटर्नची एकूण संख्या 1.05 कोटी आहे, ज्यामध्ये 36 लाख त्रैमासिक रिटर्नचा समावेश आहे, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली. विशेष म्हणजे, सोमवारी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहात सादर केला. यावर मात्र विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे.

Advertisement

दरम्यान, एप्रिल-नोव्हेंबर 2021 दरम्यान, 75 कंपन्यांनी IPO द्वारे तब्बल 89,066 कोटी रुपये उभे केले आहेत. सोमवारी संसदेत सादर करण्यात आलेल्या 2021-22 च्या आर्थिक सर्वेक्षणात ही माहिती मिळाली आहे. कोरोनाच्या संकटातही शेअर बाजाराची घोडदौड सुरुच होती. आता तर आयपीओचे दिवस आहेत. देशातील अनेक कंपन्यांनी आयपीओ आणले. पाहता पाहता कोट्यावधींचे भांडवल गोळा केले. गुंतवणूकदार सुद्धा मालामाल झाले. आता खासगी कंपन्यांप्रमाणेच सरकार कंपन्यासुद्धा आयपीओ आणत आहेत. त्यामुळे गुंतवणुकीच्या आधिक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

Loading...
Advertisement

मागील वर्षात 63 कंपन्यांनी त्यांच्या IPO द्वारे तब्बल 1 लाख 18 हजार 704 कोटी रुपयांचे भांडवल गोळा केले आहे. प्राइम डेटाबेसच्या अहवालानुसार, आयपीओमधून वाढलेला आकडा मागील वर्षाच्या तुलनेत 4.5 पट अधिक आहे. 2020 मध्ये 15 कंपन्यांनी IPO द्वारे 26 हजार 613 कोटी रुपये उभे केले होते. त्याच वेळी, 2017 मध्ये IPO मधून उभारलेल्या 68 हजार 827 कोटी रुपयांच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत जवळपास दुप्पट रक्कम उभी केली गेली आहे.

Advertisement

पेट्रोल-डिझेल जीएसटी कक्षेत आणणार ? ; पहा, काय उत्तर दिलेय केंद्र सरकारने..

Advertisement
Advertisement

Leave a Reply