Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आज सोन्या-चांदीचे भाव वाढले की घटले..? ; सोने खरेदीआधी चेक करा काय आहेत नवीन दर

मुंबई : सोने चांदी मार्केटमध्ये मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे. या वर्षात सोन्याला मागणी आणखी वाढणार असून सोने 55 हजारांच्याही पुढे जाईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता चांदीच्या बाबतीतही असाच अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 2022 आणि पुढील काही वर्षे चांदीच्या मागणीत मोठी तेजी दिसून येईल, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. सध्या या दोन्ही धातूंच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आज सोन्याचे दर वाढले आहेत की कमी झाले आहेत, हे जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे. आज सोन्याचे भाव 0.1 टक्क्यांनी वाढले आहेत. तर चांदीचे भाव 0.14 टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या सोन्याचे 48 हजारांचा टप्पा पार केला आहे. राज्यात सध्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 49 हजार 200 रुपये आहे. मागणी वाढल्याने सोन्याचे भावात आणखी वाढ होऊ शकते. सोने आता पुन्हा 50 हजारांच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Advertisement

सोन्याच्या किमतीत 0.01 टक्क्यांनी किरकोळ वाढ झाल्याने आज सोन्याचा दर प्रति तोळा 48,381 रुपये आहे. राज्यात सोन्याचा आजचा दर प्रति तोळा 49 हजार 200 रुपये आहे. तर, आज चांदीचा दरात 0.14 टक्क्यांनी वाढ झाल्याने आजचा एक किलो चांदीचा दर 64 हजार 495 रुपये आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (GJC) ने 2022 च्या अर्थसंकल्पात वस्तू आणि सेवा कर (GST) दर 1.25 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची सरकारला विनंती केली आहे. 2022-23 च्या अर्थसंकल्पाआधीच्या शिफारशींमध्ये, GJC ने सोने, मौल्यवान धातू, रत्ने आणि अशा वस्तूंपासून बनवलेल्या दागिन्यांवर 1.25 टक्के GST ची मागणी केली आहे. सध्या रत्ने आणि दागिन्यांवर जीएसटीचा दर 3 टक्के आहे.

Advertisement

सोने-चांदी बाजारभाव : आजही सोने 50 हजार पार; जाणून घ्या, काय आहेत सोन्या चांदीचे भाव

Advertisement
Advertisement

Leave a Reply