Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. ‘त्यामध्ये’ ‘जिओ’ आणि ‘एअरटेल’ राहिले फायद्यात; ‘व्होडाफोन-आयडीया’ आणि ‘बीएसएनएल’ मात्र कोमात; जाणून घ्या, डिटेल..

मुंबई : देशात टेलिकॉम ग्राहकांच्या संख्येत किरकोळ वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2021 च्या अखेरीस देशभरातील दूरसंचार ग्राहकांची संख्येत वाढ झाली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. ट्रायने दिलेल्या माहितीनुसार, या काळात रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलच्या कनेक्शनच्या संख्येत वाढ झाली आहे. रिलायन्स जिओने फिक्स्ड लाइन ब्रॉडबँड ग्राहकांच्या संख्येच्या बाबतीत बीएसएनएलला मागे टाकले आहे. या श्रेणीतील त्यांच्या कनेक्शनची संख्या 43.4 लाखांवर गेली आहे. आतापर्यंत या क्षेत्रात सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बीएसएनएलचे वर्चस्व होते.

Advertisement

नोव्हेंबर 2021 अखेर देशातील एकूण मोबाईल ग्राहकांची संख्या 116.75 कोटी झाली आहे. ट्रायच्या मासिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. महिन्याभरात मोबाइल आणि फिक्स्ड लाइन कनेक्शनमध्ये वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2021 अखेर मोबाईल ग्राहकांची एकूण संख्या 116.63 कोटी होती. मोबाइल श्रेणीमध्ये, रिलायन्स जिओ कनेक्शनची संख्या 20,19,362 ने वाढून 42.8 कोटी झाली आहे. भारती एअरटेलने या कालावधीत 13,18,251 नवीन मोबाइल ग्राहक जोडले.

Advertisement

Vodafone Idea चे मोबाईल कनेक्शन 18,97,050 नी घसरून 26.71 कोटी झाले. सार्वजनिक क्षेत्रातील बीएसएनएलने महिन्याभरात 2,40,062 ग्राहक गमावले. त्याच वेळी, एमटीएनएलच्या ग्राहकांच्या संख्येत 4,318 ने घट झाली आहे. नोव्हेंबरमध्ये देशातील फिक्स्ड लाइन कनेक्शनची संख्या 2.35 कोटी झाली आहे. ऑक्टोबरमध्ये ती 2.33 कोटी होती.

Loading...
Advertisement

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने दूरसंचार विभागाला 30,791 कोटी रुपये दिले आहेत. जिओने लिलावात मिळालेल्या स्पेक्ट्रमचे संपूर्ण दायित्व वेळेपूर्वीच भरले आहे. Jio ने 2014, 2015, 2016 मध्ये स्पेक्ट्रम घेतले होते आणि 2021 मध्ये Jio ने Bharti Airtel Limited कडून स्पेक्ट्रम देखील विकत घेतले होते. कंपनीने हे सर्व दायित्व भरले आहे. या लिलाव आणि सौद्यांमध्ये कंपनीने 585.3 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम विकत घेतले होते.

Advertisement

वाव.. BSNL चा चौकार..! ‘जिओ’, ‘एअरटेल’ ला टक्कर देण्यासाठी आणलेत चार प्लान; जाणून घ्या डिटेल..

Advertisement
Advertisement

Leave a Reply