Take a fresh look at your lifestyle.

आता राहा तयार..! म्हणून केंद्राने राज्यांना पुन्हा केलेय सतर्क; पहा, नेमके काय म्हटले ‘त्या’ पत्रात

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये राज्यांना परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत, कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होत असताना केवळ 5 ते 10 टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. परिस्थिती वेगाने बदलत आहे आणि प्रकरणांचा वेगही दिवसेंदिवस वाढत आहे.

Advertisement

अशा परिस्थितीत रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही वेगाने वाढू शकते. यासाठी आपल्याला तयार राहावे लागेल. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एकूण प्रकरणांची संख्या आणि सक्रिय प्रकरणांची संख्या यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना या पत्रात देण्यात आल्या आहेत.

Advertisement

देशात कोरोना व्हायरस आणि त्याचे नवीन प्रकार ओमिक्रॉनची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. देशाची राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्रात रुग्ण वेगाने वाढत चालले आहेत. तसेच अन्य राज्यांतही कोरोनाने आता वेग घेतला आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये निर्बंध पुन्हा कठोर केले जात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले होते, की आम्ही देशातील सर्व राज्यांमधील सध्याच्या आरोग्य पायाभूत सुविधा आणि तयारीचा सातत्याने आढावा घेत आहोत.

Advertisement

जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉनला वेरिएंट ऑफ कन्सर्नच्या श्रेणीत ठेवले आहे, असे केंद्राने याआधीच्या पत्रात म्हटले होते. अनेक देशांमध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात झालेले असूनही, कोविड-19 प्रकरणांमध्ये अतिरिक्त वाढ झाली आहे. त्यामुळेच कोरोनाच्या बाबतीत अत्यंत गांभीर्याची गरज आहे. केंद्राने म्हटले आहे की सर्व राज्यांनी तपासाला गती द्यावी आणि अधिकाधिक लोकांची तपासणी करावी आणि संसर्ग झालेल्यांना गर्दीत जाण्यापासून रोखावे, जेणेकरून संसर्गाचा वेग कमी करता येईल.

Advertisement

दरम्यान, जगभरातही कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत चालले आहेत. अमेरिका, ब्रिटेन, फ्रान्स, इटली या देशांत कोरोनाने थैमान घातले आहे. अन्य देशांतही कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत चालले आहेत. त्यामुळे या घातक आजारास रोखण्यासाठी काही देशांनी पुन्हा निर्बंध कठोर केले आहेत.

Advertisement

कोरोनाचा धसका..! मागणी वाढली म्हणून कंपन्यांनी केलाय ‘हा’ जबरदस्त प्लान; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply