बापरे.. चीनने घेतलाय ‘त्याचा’ धसका..! तब्बल दीड कोटी लोकांची करणार तपासणी; जाणून घ्या, काय आहे प्रकार ?
मुंबई : चीनमध्ये पुढील महिन्यात हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांची जोरदार तयारी करण्यात येत आहेत. यासाठी चीन सरकारने अब्जावधी रुपये खर्च केले आहेत. या स्पर्धांसाठी विदेशांतून हजारो खेळाडू येणार आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चीनचे टेन्शन वाढले आहेत. या स्पर्धांच्या आधी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. त्यात आता सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. चीनची राजधानी बीजिंग शहराजवळील तियानजिन या शहरातील सर्व लोकांची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या शहरात एक कोटी 40 लाख लोक राहतात आणि या सर्वांच्या कोविड चाचणीची तयारीही करण्यात आली आहे कारण तेथे कोविड-19 चे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये घातक Omicron प्रकारातील 2 प्रकरणांचाही समावेश आहे.
तियानजिन आणि बीजिंग दरम्यान हजारो लोक दररोज प्रवास करतात कारण या दोन शहरांदरम्यान हाय-स्पीड ट्रेनने प्रवास करण्यासाठी 30 मिनिटे लागतात. अधिकाऱ्यांनी सांगितले, की 20 लोक कोविड-19 पॉजिटिव आढळल्यानंतर, तियानजिनने संपूर्ण शहरात चाचण्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या कोविड-19 च्या प्रतिबंध आणि नियंत्रण मुख्यालयाने सांगितले की, संसर्गाची ही प्रकरणे जिनान जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवारी आढळली असून यापैकी दोन प्रकरणे ओमिक्रॉन स्वरूपातील आहेत.
तियानजिन हे चीनमधील पहिले शहर होते जेथे डिसेंबर महिन्यात ओमिक्रॉनची काही प्रकरणे नोंदवली गेली होती. परंतु त्यानंतर प्रकरणांमध्ये वाढ झाल्याची कोणतीही माहिती नाही. त्यानंतर इतर काही शहरांमध्ये प्रकरणांमध्ये वाढ झाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात चाचण्या घेतल्या. स्थानिक अधिकाऱ्यांनी राजधानी बीजिंगमध्ये संसर्ग पसरू नये म्हणून एक कोटी 40 लाख लोकसंख्येच्या तियानजिन शहरातील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. 4 फेब्रुवारीपासून हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन केले जाणार आहे.
..म्हणून चीनने घेतलाय अमेरिकेचा धसका; ‘ते’ संकट टाळण्यासाठी दिलेत ‘हे’ महत्वाचे आदेश