Take a fresh look at your lifestyle.

‘त्यामुळे’ सोने पुन्हा आलेय 48 हजारांच्या आत; पहा, आज काय घडलेय सोने मार्केटमध्ये

मुंबई : कोरोनाच्या संकटात सोने आणि चांदीचे दर सातत्याने कमी जास्त होत आहेत. आज पुन्हा सोन्याचे दर कमी झाले आहेत. काल मात्र सोन्याचे भाव वाढले होते. या दर कपातीनंतर सोने पुन्हा 48 हजारांच्या आत आले आहे. तुम्ही जर आता सोने खरेदीचा विचार करत असाल तर तुम्हाला कमी दरात सोने खरेदी करता येईल. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये आज सोन्याचे दर 0.51 टक्क्यांनी कमी झाले तर चांदीचे दर सुद्धा 1.42 टक्क्यांनी कमी झाले आहेत.

Advertisement

फेब्रुवारीसाठी सोन्याचा भाव आज 0.51 टक्क्यांनी घसरून 47,775 रुपये प्रति तोळावर पोहोचला आहे. त्याचबरोबर आजच्या व्यवहारात चांदीचे दर कमी झाले आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 1.42 टक्क्यांनी घसरून 61,356 रुपयांवर आला आहे.

Advertisement

सध्या जगभरात कोरोनाचा प्रसार वाढला आहे. युरोप अमेरिकेत तर कोरोनाने थैमान घातले आहे. आपल्याकडेही मागील काही दिवसांपासून रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्यामुळे सरकारने पुन्हा निर्बंध कठोर करण्यास सुरुवात केली आहे. या काळात सोन्यास मागणी वाढली आहे. कारण, सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. तसेच सणासुदीच्या दिवसात सोने खरेदी वाढते. या कारणामुळे देशात सोन्यास मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून सोने दरात वाढ होताना दिसत आहे.

Advertisement

सोने मार्केटवर कोरोनाचा फारसा परिणाम झाल्याचे जाणवत नाही. कारण, मागील वर्षात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोन्याचे भाव वेगाने वाढले होते. ऑगस्ट 2020 मध्ये तर सोने 56 हजार 200 रुपये असे सर्वाधिक होते. त्यानंतर मात्र दरात घट होत गेली. तरीही सध्या सोने 50 हजारांच्या आसपास आहे.

Advertisement

बाब्बो.. भारतात आले इतके सोने, दहा वर्षांचे रेकॉर्डही मोडले; पहा, एकाच वर्षात किती सोने खरेदी केलेय ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply