अहमदनगर : आजकाल जवळपास सर्वच स्मार्टफोन निर्माता कंपन्या अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले अँड्रॉइड फोन बाजारात आणत आहेत. यामुळेच आता लोकही वारंवार फोन बदलत असतात. मात्रस स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर काही महत्वाच्या गोष्टींकडे बऱ्याच जणांचे दुर्लक्ष होते, ज्यामुळे आमचे नवीन मोबाइलही स्लो होतात, बॅटरी लवकर डिस्चार्ज होण्याची समस्या उद्भवते तसेच वैयक्तिक डेटा लीक होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे अशा काही महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या तुम्ही लक्षात घेतल्या तर स्मार्टफोन बाबत तुमचे टेन्शन निश्चितच कमी होईल.
जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेतला असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने अॅप नोटिफिकेशन सेट करू शकता. यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर अॅप आणि नोटिफिकेशन्सवर जा आणि आपल्या आवडीची ट्यून निवडा. याशिवाय फोनच्या लॉक स्क्रीनपर्यंत तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.
नवीन फोन घेतल्यानंतर त्यामध्ये आवश्यक असलेलेच मोबाइल अॅप डाउनलोड करा. अत्यावश्यक मोबाईल अॅपपैकी एक म्हणजे आरोग्य सेतू. याबरोबरच तुम्ही PhonePe, Paytm, JioPay, Big Basket आणि WhatsApp सारखे उपयुक्त मोबाइल अॅप देखील डाउनलोड करू शकता.
आजच्या काळात, बहुतेक लोक बँकिंग आणि ऑनलाइन व्यवहार करतात. अशा परिस्थितीत फोन सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे आहे. फोन सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही पिन आणि पॅटर्न लॉक वापरू शकता. याबरोबरच तुम्हाला फोनमध्ये अनेक सुरक्षा फिचर्स मिळतील, ज्याद्वारे तुमचा फोन सुरक्षित राहील.
बहुतेक लोक तक्रार करतात की त्यांच्या नवीन स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते. याचे कारण असे की त्यांच्या होम स्क्रीनवर मोठ्या संख्येने विजेट्स (widgets) आहेत, जे सतत काम करतात, ज्यामुळे बॅटरीचा वापर वाढतो. बॅटरीचा वापर कमी करण्यासाठी फोन स्क्रीनवरून विजेट्स काढून टाका, त्यामुळे बॅटरीचा वापर जास्त होणार नाही.
स्मार्टफोन खरेदी करण्याचा आहे ‘प्लान’..? मग, ‘या’ महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाच; फायदाच होईल