Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कोरोना कायम असतानाही विदेशातील गुंतवणूक वाढणार; जाणून घ्या, कुणी व्यक्त केलाय ‘हा’ अंदाज

नवी दिल्ली : कोरोनाचे संकट कायम असतानाही भारतीय बाजारात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक चांगली राहिली. 51 हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त गुंतवणूक होती. परदेशी गुंतवणूकदार सलग तिसऱ्या वर्षी देशांतर्गत शेअर बाजारात निव्वळ खरेदीदार राहिले आणि हा कल कायम राहिल, असे अपेक्षित आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे, की जागतिक वित्तीय प्रणाली अजूनही तरलतेने भरलेली आहे. उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये पुढील काही महिन्यात गुंतवणकीचा वाढता ट्रेंड कायम राहणार आहे.

Advertisement

2021 या वर्षात अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर पूर्वपदावर असल्याचे दिसून आले. 2020 मधील 1.03 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत यावर्षी गुंतवणूक मात्र कमी आहे. महत्त्वाचे म्हणजे, 2019 मध्ये, FPIs ने 1.35 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. या वर्षात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या पहिल्या तीन महिन्यांत FPIs ने निव्वळ गुंतवणूक केली. त्याचप्रमाणे जून, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही ते निव्वळ गुंतवणूकदार राहिले. उर्वरित सहा महिन्यांत एफपीआयची निव्वळ विक्री झाली.

Advertisement

डिपॉझिटरी डेटा दर्शवितो, की परदेशी गुंतवणूकदारांनी इक्विटीमध्ये 26,001 कोटी रुपये, कर्ज किंवा बाँड मार्केटमध्ये 23,222 कोटी रुपये आणि हायब्रिड साधनांमध्ये 1,848 कोटी रुपये गुंतवले आहेत. या वर्षात तुलनेने कमी एफपीआय प्रवाह होता. ज्युलियस बेअरचे कार्यकारी संचालक मिलिंद मुछाला म्हणाले की, डॉलर निर्देशांक मजबूत झाल्यामुळे आणि नफा-वसुली झाल्यामुळे असे घडले.

Loading...
Advertisement

परकीय गुंतवणूकदारांचा भारताकडे कल हा त्यांना शेअर बाजारात मिळणाऱ्या चांगल्या परताव्याच्या कारणामुळे आहे. 2020 च्या मध्यापासून बाजारातील तेजी कायम आहे. आणि 2021 मध्ये बाजाराने नवा रेकॉर्ड केला आहे. सध्या बाजारात सुधारणा दिसून येत आहे. पण तरीही शेअर बाजारात मोठी घसरण झालेली नाही. या कारणामुळे गुंतवणूकदारांचे आगमन सुरूच आहे. तसेच प्राथमिक बाजारातील चांगला परतावा आणि नवीन कंपन्यांची वाढती संख्या यामुळे परदेशी गुंतवणूकदार देखील भारताबद्दल सकारात्मक आहेत.

Advertisement

अर्र.. अर्थव्यवस्थेसमोर पुन्हा आलेय ‘ते’ मोठे संकट; आरबीआयने सांगितलेत ‘हे’ महत्वाचे उपाय; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply