Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

WHO ने ओमिक्रॉनबाबत केलाय मोठा खुलासा.. म्हणून या व्हेरिएंटचा धोका जास्त; पहा, किती टक्के वाढलेत रुग्ण

जिनेव्हा : जगभरात सध्या ओमिक्रॉनचा धोका वाढला आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. संघटनेने ओमिक्रॉन प्रकाराबद्दल म्हटले आहे, की सध्या त्याचा धोका खूप जास्त आहे. कोविड-19 वरील आपल्या ताज्या अपडेटमध्ये, जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे, की या प्रकाराचे पहिले प्रकरण 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत नोंदवले गेले. मात्र, सध्या तेथे Omicron चा प्रादुर्भाव थोडा कमी झाला आहे. त्यामुळे असे दिसून येत आहे, की येथे ओमिक्रॉनचा प्रभाव काही काळासाठी कमी झाला आहे, असे संघटनेने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Advertisement

मात्र, असे असले तरी ओमिक्रॉन प्रकारामुळे उद्भवणारा धोका अजूनही खूप जास्त आहे. आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांवरून असे स्पष्ट होते की ओमिक्रॉन आधीच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा वेगाने पसरत आहेत. या व्हेरिएंटचे रुग्ण 2 ते 3 दिवसांतच दुप्पट होत आहेत. ओमिक्रॉन प्रकरणे वेगाने वाढत असून सध्या ब्रिटेन आणि अमेरिकेत हाहाकार उडाला आहे. दक्षिण आफ्रिकेत मात्र प्रकरणांमध्ये घट झाली आहे.

Loading...
Advertisement

युनायटेड किंगडम, दक्षिण आफ्रिका आणि डेन्मार्कमधील प्राथमिक माहितीवरुन असे दिसते, की ओमिक्रॉन प्रकरणांमध्ये डेल्टा प्रकारापेक्षा रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कमी असतो. संघटनेने असेही म्हटले आहे, की 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान कोविड -19 च्या प्रकरणांमध्ये एकूण 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिकेत तर कोरोना रुग्णांमध्ये तब्बल 39 टक्के वाढ झाली आहे.

Advertisement

कोरोना अपडेट : आज देशभरात ओमिक्रॉनचे ‘इतके’ रुग्ण सापडले; जाणून घ्या, काय आहे राज्यांतील परिस्थिती

Advertisement
Advertisement

Leave a Reply