Take a fresh look at your lifestyle.

नवीन वर्षात बजेट बिघडणार..! डिजिटल पेमेंटमध्ये होणार मोठा बदल, ‘एलपीजी’ बाबतही होणार निर्णय

नवी दिल्ली : नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. देशात दर महिन्याच्या पहिल्या दिवशी काही बदल किंवा नवीन नियम लागू होतात. अशा परिस्थितीत 1 जानेवारी 2022 पासून अनेक बदल किंवा नवीन नियम लागू होतील. विशेषत: सामान्य ग्राहकांच्या हिताशी संबंधित अनेक बदल होणार आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरगुती गॅस टाकीच्या किंमतीबाबत मोठा निर्णय होणार आहे.

Advertisement

एलपीजी गॅसच्या किंमतीबाबत दर महिन्याच्या पहिल्या दिवशी आढावा बैठक घेतली जाते. अशा परिस्थितीत या बैठकीत एलपीजी दरात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता मोदी सरकार पेट्रोल-डिझेलप्रमाणे गॅसही स्वस्त करेल, असा अंदाजही वर्तवला जात आहे.

Advertisement

नवीन वर्षाची पहिली तारीख तुमच्यासाठी अनेक अर्थाने खास असेल. नवीन वर्षात तुमचे बजेट बिघडू शकते. या बदलांचा सामान्य लोकांवर परिणाम होणार आहे. नवीन वर्षात विशेषत: एलपीजीच्या किमतीबाबत मोठा निर्णय होणार आहे.

Advertisement

1 जानेवारी 2022 पासून एलपीजीची किंमत वाढणार का? मात्र, दिवाळीपूर्वीच एलपीजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आली होती. एलपीजी गॅसच्या दरात 266 रुपयांनी मोठी वाढ झाली असली तरी ही वाढ केवळ व्यावसायिक गॅस दरात करण्यात आली आहे. घरगुती एलपीजीचे किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत व्यावसायिक एलपीजीची किंमत अजूनही 2 हजार रुपयांच्या पुढे आहे. पूर्वी तो 1733 रुपये होता. त्याचवेळी मुंबईत 1683 रुपयांना मिळणारा 19 किलोची गॅस टाकी सध्या 1950 रुपयांना मिळत आहे.

Advertisement

कोलकातामध्ये 19 किलो इंडेन गॅसचे दर 2073.50 रुपये तर चेन्नईमध्ये 19 किलो गॅस टाकी 2133 रुपयांना मिळत आहे. यासोबतच नव्या वर्षात डिजिटल पेमेंटबाबतही मोठा बदल होणार आहे. आतापासून सर्व बँका त्यांच्या ग्राहकांना याबाबत माहिती देत ​​आहेत. मोफत मासिक मर्यादा संपल्यानंतर डिजिटल पेमेंटसाठी वाढलेले शुल्क लागू होईल.

Advertisement

वाव.. भारीच आहे की..! गॅस बुकिंगवर मिळवा तीन हजारांपर्यंत कॅशबॅक; पहा, कुणी आणलीय ही भन्नाट ऑफर

Advertisement
Advertisement

Leave a Reply