Take a fresh look at your lifestyle.

आरोग्य विमा घेताना ‘या’ महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाच; नुकसान होणार नाही; जाणून घ्या, महत्वाची माहिती

मुंबई : कोरोना संकटाच्या काळात आरोग्याचे महत्व सर्वांनाच समजले आहे. त्यामुळे या काळात आरोग्य विमा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य विमा सुद्धा महत्वाचाच आहे. मात्र, विमा खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. विमा घेताना या गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे या गोष्टींचा विचार करून त्यानुसार आरोग्य विमा खरेदी करणे केव्हाही फायदेशीर ठरेल. विमा काढताना काय काळजी घ्यावी, याबाबत माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

तुम्ही जेव्हा एखादा आरोग्य विमा काढता तेव्हा सर्व प्रथम हा विचार करायला पाहिजे, की तुम्हाला असेलेला आजार या विम्यामध्ये कव्हर होतो की नाही, किंवा तुम्हाला जर एखाद्या आजाराची भीती वाटत असेल आणि तुम्ही जर त्या संभाव्य आजारासाठी विमा काढणार असाल तर तो त्यामध्ये कव्हर होतो की नाही हे अवश्य पहावे. संभाव्य आजार जर आरोग्य विम्यात समाविष्ट नसेल तर तुमचे पैसे वाया जाऊ शकतात.

Advertisement

ज्यावेळी तुम्ही विमा घेता त्यावेळी त्या विम्याचा क्लेम किती मिळणार आहे हे आधीच माहिती करुन घ्या. म्हणजेच, विम्यातून मिळणाऱ्या पैशांतून तुम्ही आजारावरील उपचारावर झालेला सर्व खर्च भागवता येईल का, याचा विचार करा. शक्यतो खर्च पूर्णपणे कव्हर होणाऱ्या आरोग्य विम्यालाच प्राधान्य द्यावे. विम्यामधून मिळणाऱ्या पैशातून जर तुमचा सर्व खर्च भागल्यास तुमच्यावर आर्थिक ताण येत नाही.

Advertisement

तुम्ही ज्या कंपनीचा विमा घेणार आहात, त्या कंपनीचे देशातील विविध रुग्णालयांशी करार केलेले असतात. संबंधित कंपनीचे ज्या रुग्णालयांशी करार आहे, त्याच रुग्णालयात तो विमा ग्राह्य धरला जातो. त्यामुळे तुम्ही ज्या कंपनीचा विमा घेणार आहात, त्या कंपनीच्या लीस्टमध्ये तुमच्या जवळपास असणारे किती रुग्णालये आहेत? हे काळजीपूर्वक पहावे. म्हणजे तुम्हाला उपचारासाठी जास्त धावपळ करावी लागणार नाही.

Advertisement

अरे वा..आता फक्त एक हजारात मिळेल आरोग्य विमा..! पहा, काय आहे नेमकी स्कीम

Advertisement
Advertisement

Leave a Reply