Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

स्मार्टफोन खरेदी करण्याचा आहे ‘प्लान’..? मग, ‘या’ महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाच; फायदाच होईल

मुंबई : मागील काही वर्षात मोबाइल खरेदीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आज स्मार्टफोन नाही, असे सहसा दिसत नाही. त्यातही कंपन्या नवीन स्मार्टफोन सातत्याने मार्केटमध्ये आणत असतात. त्यामुळे नवीन फोन आला, की कोणता फोन खरेदी करायचा, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, असा प्रश्न पडतो. अनेक जण तर गोंधळात पडतात. कोणता स्मार्टफोन खरेदी करणे योग्य ठरेल, याचा निर्णय घेता येत नाही.

Advertisement

जर तुम्ही फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि कोणता स्मार्टफोन चांगला आहे हे ठरवू शकत नसाल, तर तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टींची माहिती असणे गरजेचे ठरते. मोबाइल फोन खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही स्वस्त किमतीत चांगला फोन खरेदी करू शकता.

Advertisement

मोबाईल फोन घेण्यापूर्वी हे ठरवा की स्मार्टफोन घेण्याचे तुमचे बजेट किती आहे? अनेकदा लोक जास्त किंमतीत विकत घेतात. स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही असे मात्र करू नका. तुमच्या बजेटमध्ये येणारा फोन तुम्ही विकत घ्यावा.

Advertisement

फोन खरेदी करताना हे लक्षात ठेवा, की त्या फोनमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टींची गरज आहे? अनेकदा लोक जास्त रॅम आणि स्टोरेज असलेले फोन खरेदी करतात, ज्याची त्यांना गरज नसते. अशा परिस्थितीत फोन खरेदी करताना विशेष काळजी घ्या की फोनमध्ये कोणते फिचर हवे आहेत? त्यानुसार तुम्ही फोन विकत घ्यावा.

Loading...
Advertisement

फोन खरेदी करताना, तुम्ही आधी हे निश्चित करा की कोणत्या ऑपरेट सिस्टमवर चालणारा फोन तुम्हाला खरेदी करायचा आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणत्याही ऑपरेट सिस्टमवर काम करणारा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

Advertisement

स्मार्टफोन खरेदी करताना त्याच्या स्थिरतेकडे नक्कीच लक्ष द्या. दीर्घकाळ टिकणारा फोन खरेदी करावा. यासाठी तुम्ही त्या फोनचा ट्रॅक रेकॉर्ड तपासू शकता.

Advertisement

2021 मध्ये कोणता स्मार्टफोन राहिला नंबर वन; जाणून घ्या, वर्षभरातील टॉप 5 स्मार्टफोन..

Advertisement
Advertisement

Leave a Reply