Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

किराणा खरेदी करताय..? मग ‘या’ नेहमीच्या सवयी टाळाच; खरेदीचे बजेट बिघडणार नाही..

अहमदनगर : दर महिन्यास प्रत्येकाला किराणा खरेदी करावा लागतो. याबाबतीत प्रत्येकाचे एक बजेट ठरलेले असते. बऱ्याचदा हे बजेट बिघडते सुद्धा. कधी भाव वाढल्याने तर कधी अनावश्यक वस्तू खरेदी केल्याने. त्यानंतर मात्र महागाई वाढली असे अनेकांना वाटते. मात्र, कधी-कधी सवयीमुळे लोक खरेदीमध्येही जास्त खर्च करतात. जेव्हा आपण खरेदीसाठी निघतो तेव्हा आपण ते खूप सोपे समजतो. मात्र, बऱ्याचदा या खरेदीसाठी जास्त पैसे खर्च होतात. यावेळी आपल्या लक्षातही येत नाही. काही गोष्टी अशा आहेत, की त्या जर टाळता आल्या तर आपले किराणा खरेदीचे बजेट बिघडणार नाही. अनावश्यक खर्चही होणार नाही. चला तर मग, जाणून घेऊ अशा काही गोष्टी ज्या सहज टाळता येण्यासारख्या आहेत.

Advertisement

अनेक वेळा जेव्हा आपण किराणा मालाच्या खरेदीसाठी शॉपिंग मॉलमध्ये जातो तेव्हा तेथील काही लोक नवीन गोष्टी कोणत्या आहेत, याची माहिती देतात. त्यामुळे सहाजिकच त्या वस्तू खरेदी कराव्याशा वाटतात. काही जण खरेदीही करतात. त्यामुळे अनावश्यक खर्च वाढतो. या गोष्टी टाळता आल्या तर खर्चाचे बजेट बिघडणार नाही.

Advertisement

अनेकांना सवय असते की ते दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किराणा सामान खरेदी करण्यासाठी पोहोचतात. ही सवय तुमच्या खिशाला भारी पडू शकते. जेव्हा तुम्ही हे करता, तेव्हा तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी तुम्ही खरेदी करता. असे केल्याने तुमचे मासिक बजेट बिघडू शकते. जर तुम्ही एक यादी तयार केली आणि एकाच वेळी खरेदी केली तर ते तुमच्यासाठी चांगले सिद्ध होईल.

Loading...
Advertisement

कदाचित ही तुमची सवय आहे. वस्तू पाहिल्यानंतर तुम्हाला तो विकत घ्यावाशी वाटत असेल आणि कधीतरी उपयोगी पडेल असा विचार करून खरेदी केली तर ते योग्या ठरणार नाही. जेव्हा तुम्ही उपाशी पोटी खरेदीला जाता तेव्हा हे सहसा घडते, कारण नंतर आपण जे काही खाद्यपदार्थ पाहतो ते खरेदी करतो, असा अनुभव आहे.

Advertisement

जेव्हा तुम्ही किराणा सामानाच्या खरेदीसाठी जाता तेव्हा मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी केल्या जातात. कारण, जर वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या तर अधिक पैसे वाचतील, असे अनेकांना वाटते. मात्र, हे घडेलच असे नाही. गरजेपेक्षा जास्त खरेदी केल्यास ते खराब होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार खरेदी करा.

Advertisement

होऊ दे खर्च..! कोरोना काळातही लोकांची जोरदार खरेदी सुरू; जाणून घ्या, काय आहे खरे कारण

Advertisement
Advertisement

Leave a Reply