नवी दिल्ली : जगभरात ओमिक्रॉनचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळे या घातक व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध आधिक कठोर केले जात आहेत. ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातून प्रयत्न तीव्र झाले आहेत. इस्रायलने कोरोना विरोधी लसीचा चौथा डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी कठोर निर्बंधांसारखी निर्णयही या देशाने घेतले आहेत.
युरोपीय देशात या व्हेरिएंटने थैमान घातले आहे.
जर्मनी आणि आणखी काही देशांनी पूर्ण किंवा आंशिक लॉकडाऊन घोषित केले आहे. आणि ऑस्ट्रिया, बेल्जियम, स्पेनसह इतर अनेक देश कठोर उपाययोजना लागू करण्याचा गंभीरपणे विचार करत आहेत. तर दक्षिण कोरियातील व्यावसायिकांनी कठोर निर्बंधांना विरोध केला आहे.
अमेरिकेत तर ओमिक्रॉन बरोबरच डेल्टा व्हेरिएंटचेही रुग्ण वेगाने वाढत चालले आहेत. अमेरिकेत कोरोना प्रतिबंधक लसी भरपूर प्रमाणात आहेत. तसेच कोरोना तपासण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणार असल्याचे आश्वासन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिले आहे. त्यामुळे अमेरिका सरकारने देशात लॉकडाऊनचा विचार अद्याप केलेला नाही. ज्यांचे अद्याप लसीकरण झालेले नाही, त्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सिंगापूरमध्ये नवीन तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. सिंगापूरमध्ये गुरुवारपासून विमाने आणि बसच्या नवीन तिकिटांची विक्री बंद होणार आहे. देशात बाहेरील लोक जास्त प्रमाणात येऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. बुधवारी जपानमध्ये ओमिक्रॉनच्या संसर्गाचे पहिले संशयित प्रकरण नोंदवले गेले.
दरम्यान, भारतात सुद्धा ओमिक्रॉनचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना आवश्यक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत.
बापरे.. अमेरिका दुहेरी संकटात..! ओमिक्रॉन बरोबरच ‘या’ व्हेरिएंटनेही नागरिक हैराण; जाणून घ्या अपडेट