Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होणार का..? ; जागतिक बाजारातील घडामोडींकडे तेल कंपन्यांचे दुर्लक्ष; जाणून घ्या, कच्चे तेलाचे दर किती घटले

नवी दिल्ली : ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे काही देशांमध्ये पुन्हा कठोर निर्बंधांचे दिवस आले आहेत. या व्हेरिएंटला रोखण्यासाठी निर्बंध कठोर केले आहेत. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थांवर होत आहे. जागतिक बाजारातही अनिश्चिततेचे वातावरण आहे. कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत आहेत. आजही हा ट्रेंड कायम होता. आज आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाचे दर 0.71 टक्क्यांनी वाढून 72.03 डॉलर प्रति बॅरल असे झाले आहेत. तर दुसरीकडे, WTI क्रूड तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. WTI क्रूड तेलाची किंमत 3.71 टक्क्यांनी कमी होऊन 68.23 डॉलर प्रति बॅरल असे झाले आहेत.

Advertisement

युरोप आणि अमेरिकेत ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊनची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे तेलाच्या मागणीत घट येईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे येत्या काही दिवसांत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे. मात्र, तेल कंपन्यांनी अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही. मागील दीड महिन्यांपासून देशात इंधनाचे भाव स्थिर आहेत. या काळात अनेक वेळा कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत. मात्र, याचा फायदा तेल कंपन्यांनी नागरिकांना होऊ दिलेला नाही.

Advertisement

देशातील आघाडीच्या सरकारी तेल कंपन्यांनी 21 डिसेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. सरकारी मालकीच्या तेल कंपन्या IOC, BPCL आणि HPCL यांनी तेलाच्या किमतीत कोणतेही बदल केलेले नाहीत. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल होऊन आज ४८ दिवस झाले आहेत.

Loading...
Advertisement

राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत आज पेट्रोलचा दर 109.98 रुपये प्रतिलिटर आहे, तर एक लिटर डिझेलचा दर 94.14 रुपये आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 101.40 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 91.43 रुप आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 104.67 रुपये आणि डिझेलचा दर 89.79 रुपये प्रति लिटर आहे.

Advertisement

… म्हणून महिनाभरापासून इंधनाचे दर वाढलेच नाहीत; पहा, काय आहेत महत्वाची कारणे

Advertisement
Advertisement

Leave a Reply