Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आजची रेसिपी : नाश्त्यासाठी असे तयार करा टेस्टी कांदे पोहे; ही घ्या, अगदी सोपी रेसिपी

अहमदनगर : जर तुम्हाला नाश्त्यात काही वेगळे करायचे असेल तर कांदा पोहे तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. कांदा पोहे जितके स्वादिष्ट असतात तितकेच ते आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात. आपल्याकडे नाश्त्यासाठी पोहे असतात. यामध्ये कमी कॅलरीज आढळतात. कांदा पोहे आज फक्त राज्यात नाही तर देशात अनेक राज्यात तयार होतात.

Advertisement

मुंबईत तर कांदा पोहेची एक वेगळीच क्रेझ आहे. विशेष म्हणजे, कांदा पोहे तयार करणेही अगदीच सोपे आहे. काही मिनिटांत पोहे तयार होतात. सकाळी ऑफिसला निघण्याची गडबड असते. अशा वेळेत नाश्ता म्हणून कांदा पोहे हा चांगला पर्याय ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊ या कांदे पोहे तयार करण्याची सोपी रेसिपी..

Advertisement

पोहे चार कप, अर्धा कप शेंगादाणे, एक कप चिरलेला कांदा, दोन चमचे तेल, काही मिरचीचे तुकडे, एक चमचा जिरे, सात ते आठ कडीपत्त्याची पाने, एक चिमूट हिंग, एक चमचा हळद आणि चवीनुसार मीठ.

Advertisement

सर्व प्रथम कांदा पोहे पुरेशा पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घ्यावेत. यानंतर चाळणीतून गाळून त्यात थोडे मीठ टाका. दुसरीकडे तवा गरम करा. आता त्यात तेल टाका. त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, हिंग आणि कांदा टाका. 3 ते 4 मिनिटे तसेच राहू द्या. लक्षात ठेवा, फोडणी जळणार नाही, याची काळजी घ्या.

Loading...
Advertisement

कांदा बदामी रंगाचा झाला की त्यात पोहे आणि हळद टाका. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यात थोडी साखर देखील टाकू शकता. आता या सर्व गोष्टी पुन्हा एकत्र करा. दोन ते तीन मिनिटांनी गॅस बंद करून कढई काढून घ्या. आता तुमचे कांदा पोहे तयार आहेत. सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी कमी वेळात तयार होणारा हा एक उत्तम खाद्यपदार्थ आहे.

Advertisement

‘असे’ पदार्थ नाश्त्यात खा आणि मस्त राहा; वाचा आरोग्यदायी अशा महत्वाच्या टिप्स

Advertisement

आजची रेसिपी : सकाळच्या नाश्त्यात चमचमीत खायचेय तर बनवा मसाला चीज टोस्ट

Advertisement
Advertisement

Leave a Reply