Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्राला भरली हुडहुडी..! पुढील दोन दिवसांत कशी असेल परिस्थिती, हवामान विभाग काय म्हणतेय…?

मुंबई : गुलाबी थंडीला आता खरी सुरुवात झाली आहे. खरे तर दिवाळीनंतरच थंडीची चाहूल लागत असते. मात्र, मागील काही दिवसांपासून राज्यात ऊन-सावल्यांचा खेळ सुरु होता. ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाली होती. या वातावरणाचा पिकांवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.. अनेक पिकांवर राेगांचा प्रादुर्भाव झाला. थंडी जाणवत नसल्याने उबदार कपडे कपाटात पडले होते.

Advertisement

दरम्यान, हिवाळ्याचा ऋतू आता खऱ्या अर्थाने राज्यात पाहायला मिळत आहे.. यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे राज्याला हुडहुडी भरल्याचे सांगितले जात आहे. तसेच पुढील दोन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेता येणार असल्याचे दिसते..

Advertisement

राज्यातील जळगाव, रायगड, पालघर, मुंबईच्या तापमानात मोठी घट नोंदवण्यात आली. धुळ्यात तापमानाचा पारा 5.5 अंश सेल्सिअस वर गेला होता. विदर्भातही थंडीची लाट पसरली आहे. अमरावतीत रात्रीच्या तापमानात घट झाली असून, हिमालयातील बर्फवृष्टीचा परिणाम पाहायला मिळत आहे.

Loading...
Advertisement

कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या चित्र दिसत आहे. उबदार कपडे घालूनच नागरिक घराबाहेर पडत आहेत. तापमान 12 ते 13 अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली आहे.

Advertisement

दरम्यान, कडाक्याच्या थंडीत साथीचे आजार पसरण्याची भीती असते. सर्दी-खोकला असे विकार मोठ्या प्रमाणात उफाळून येतात. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याबाबत काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे..

Advertisement

एलआयसीच्या ‘आयपीओ’साठी ‘वाट बघा’..! कधीपर्यंत येणार जाणून घेण्यासाठी वाचा…!
शेअर बाजारात आठवड्याची सुरुवात घसरणीने, या गोष्टीचा बाजारावर मोठा परिणाम..

Advertisement
Advertisement

Leave a Reply