Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजारात आठवड्याची सुरुवात घसरणीने, या गोष्टीचा बाजारावर मोठा परिणाम..

मुंबई : गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्याची सुरुवातही भारतीय शेअर बाजारात मोठ्या घसरणीने झाल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी (ता. 20) शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स (Sensex) व निफ्टी (Nifty) मध्ये मोठी घसरण दिसून आली. प्री ओपन सेशनमध्ये बीएसई सेंन्सेक्स 500 पॉईंट्सहून खाली येत थेट 56,500 वर पोहोचला. नंतर बाजार उघडताच सेन्सेक्स 675 पॉईंट्सने घसरुन 56,335 पॉईंट्सवर पोहोचला. एनएसई निफ्टी 218 पॉईंट्सने घसरुन 16765 पॉईंट्सवर पोहोचला होता.

सिप्ला, एशियन पेंट्स, टीसीएस आणि पॉवर ग्रिड कॉर्प हे निफ्टीमध्ये टॉप गेनर्स होते, तर टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, बीपीसीएल, बजाज फिनसर्व्ह आणि एसबीआय हे टॉप लुझर्स होते.

Advertisement

विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 17 डिसेंबर रोजी भारतीय बाजारात 2,069.90 कोटी रुपयांची विक्री केली. त्याच वेळी, या दिवशी देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी 1,478.52 कोटी रुपयांची खरेदी केली.

Loading...
Advertisement

शेअर बाजारात गेल्या आठवड्याची सुरुवातही अशाच प्रकारे घसरणीने झाली होती. दोन आठवड्यांत आलेल्या तेजीनंतर सध्या घसरण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. जगभरात सध्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने गुंतवणूदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचे पडसाद शेअर मार्केटवर दिसत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे..

Advertisement
आंतरराष्ट्रीय बाजारातही सध्या घसरण सुरु असल्याचे चित्र आहे. त्याचाही परिणाम भारतीय शेअर बाजारावर होताना दिसत असल्याचे बोललं जाते. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरु असलेल्या घसरणीमुळे गुंतवणुकदारांचे कोट्यवधींचे रुपयांचे नुकसान झालंय. त्यामुळे त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारचे मार्केट करेक्शन होतच असते.. अशा मार्केट करेक्शन किंवा फॉलमध्ये लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी चांगली संधी असून, चिंता करण्याचे कारण नसल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत.
Advertisement

Leave a Reply