Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. दिल्ली नाही तर हे शहर ठरलयं सर्वात प्रदूषित; पहा, कसे वाढलेय प्रदूषण..?

नवी दिल्ली : सध्या जगभरात प्रदूषणाच्या समस्येने हाहाकार उडाला आहे. वाढते प्रदूषण मानवी आरोग्यास अत्यंत धोकादायक ठरत आहे. इतकेच नाही तर या प्रदूषणामुळे कोरोनाचा धोकाही वाढला आहे. जगातील अनेक देश वेगाने विकसित होत असले तरी त्या बरोबर प्रदूषणाची समस्या सुद्धा वाढत आहे. सध्या चीन, भारतासह अन्य देशात वायू प्रदूषण वेगाने वाढत आहे. देशात तर मोठ्या शहरात या समस्येने विक्राळ रुप धारण केले आहे.

Advertisement

उत्तर भारतातील अनेक शहरे प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. राजधानी दिल्ली शहरात तर प्रदूषण इतके वाढले आहे, की लोकांना घराबाहेर पडणे सुद्धा कठीण बनले आहे. फक्त दिल्लीच नाही तर येथील अन्य मोठी शहरे याच समस्येने हैराण झाली आहे. आताच हाती आलेल्या माहितीच्या आधारे, सध्याच्या घडीला उत्तर भारतात गाझियाबाद हे शहर सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे. या शहराचा प्रदूषणाचा 2.5 पार्टिक्युलेट मॅटर हा दिल्ली शहरापेक्षाही खराब स्थितीत आहे. उत्तर भारतातील 56 शहरांतील 137 वायू निरीक्षण स्टेशनने दिलेल्या माहितीवरुन ही आकडेवारी मिळाली आहे.

Advertisement

सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंटने सांगितले, की हिवाळ्याच्या सुरुवातीला धुक्यामुळे लहान स्वच्छ शहरांतील 2.5 पार्टिक्युलेट मॅटरचे प्रमाण दिल्लीत नोंदवलेल्या आकडेवारीपेक्षा जास्त असू शकते.

Advertisement

दरम्यान, गेल्या काही वर्षांत वायू प्रदूषण हा एक मोठा धोका म्हणून समोर आला आहे. वेगाने वाढणारी वाहनांमुळे शहरांतील प्रदूषणात मोठी वाढ होत आहे. आज तर राजधानी दिल्ली शहरात श्वास घेणे सुद्धा कठीण झाले आहे. या शहरात वायू प्रदूषण प्रचंड वाढले आहे. हवेची गुणवत्ता खराब झाल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन येथील प्रशासनाने केले आहे. जगातील अन्य देशांनाही या संकटाचा सामना करावा लागत आहे. भारता शेजारील चीन आणि पाकिस्तान या देशांतही वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

Advertisement

वाव.. जगातील ‘त्या’ शहरांनी ‘असे’ केलेय प्रदूषण कंट्रोल; जाणून घ्या, कोणते निर्णय ठरले फायद्याचे..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply