पुणे : कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. त्यात आता महागाईचा भडका उडाला आहे. इंधना बरोबरच एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे घरखर्चाचे बजेट कोलमडले आहे. अशा परिस्थितीत डिजिटल पेमेंट अॅप आधारीत कंपनी पेटीएमने पुन्हा एकदा खास ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत तब्बल 3 हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅक तुम्ही मिळवू शकता.
तुम्ही हा कॅशबॅक तीन वेळा मिळवू शकता. यासाठी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी कराव्या लागतील. गॅस टाकी बुक करण्यासाठी तुम्हाला पेटीएम वॉलेट, युपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे पेमेंट करावे लागेल. ही ऑफर फक्त अशा लोकांसाठी आहे ज्यांनी अद्याप पेटीएमद्वारे गॅस बुकिंग केलेले नाही. याद्वारे पहिल्या तीन वेळेस गॅस नोंदणी करुन प्रति नोंदणीसाठी एक हजार रुपये कॅशबॅक मिळवू शकता. हा कॅशबॅक पहिल्या नोंदणीवर 10 रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत असू शकतो. दुसरा आणि तिसऱ्या वेळेस गॅस बुक केल्यानंतर तुम्हाला स्क्रॅच कार्डमध्ये 5 ते एक हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी डिसेंबर 2021 आधी पेटीएमद्वारे गॅस नोंदणी करणे आवश्यक आहे. यानंतर संबंधित ग्राहकास स्क्रॅच कार्ड मिळेल. ग्राहकास उर्वरीत दोन बुकिंग पुढील दोन महिन्यात पूर्ण करणे गरजेचे राहणार आहे.
सध्याच्या परिस्थितीत घरगुती गॅस टाकीच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. आता गॅस टाकीसाठी 900 पेक्षा जास्त पैसे द्यावे लागत आहेत. या व्यतिरिक्त अन्य महागाई सुद्धा वाढली आहे. सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात मागील नोव्हेंबर महिन्यात किरकोळ आणि घाऊक महागाईतही वाढ झाली आहे.
गॅस कनेक्शन करायचेय ट्रान्सफर..? मग, ‘या’ सोप्या पद्धतीने अडचणी होतील दूर; जाणून घ्या, डिटेल