Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

गॅस कनेक्शन करायचेय ट्रान्सफर..? मग, ‘या’ सोप्या पद्धतीने अडचणी होतील दूर; जाणून घ्या, डिटेल

अहमदनगर : आजकाल नवे गॅस कनेक्शन घ्यायचे असेल तर फार वेळ लागत नाही. अगदीच काही वेळात आपल्याला गॅस कनेक्शन मिळते. मात्र, ज्यावेळी तुम्ही दुसऱ्या शहरात स्थायिक होता, त्यावेळी गॅस कनेक्शनचे काय होणार, असा प्रश्न निर्माण होतो. गॅस कनेक्शन हस्तांतरीत कसे करता येईल, असाही प्रश्न असतोच. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमचे गॅस कनेक्शन हस्तांतरित करायचे असेल, तर त्यासाठी एक मार्ग आहे, जो संपूर्ण देशात लागू आहे. त्याच्या मदतीने तुम्ही तुमचे गॅस कनेक्शन हस्तांतरित करू शकता. याबद्दल जाणून घेऊ या…

Advertisement

गॅस कनेक्शन हस्तांतरित करण्यासाठी, तुम्हाला प्रथम तुमच्या शहराच्या गॅस एजन्सीला भेट द्यावी लागेल जिथून तुमचे गॅस कनेक्शन आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे असलेली गॅस टाकी आणि रेग्युलेटर जमा करावे लागेल. यानंतर एजन्सी तुम्हाला आधी जमा केलेले पैसे देईल.

Advertisement

तुम्हाला गॅस एजन्सीकडून एक फॉर्म देखील मिळेल, ज्यामध्ये तुमच्याकडे गॅस कनेक्शन असल्याचे लिहिलेले असेल. तुम्हाला हा फॉर्म तुमच्यासोबत ठेवावा लागेल, कारण तो तुमच्या नवीन शहरात तुम्हाला उपयोगी पडेल.

Loading...
Advertisement

आता तुम्हाला तुमच्या नवीन शहरातील गॅस एजन्सीमध्ये गेल्यानं तेथे तो फॉर्म तुमच्या एजन्सीला दाखवावा लागेल. तुम्हाला तुमच्या जुन्या एजन्सीकडून मिळालेला हाच फॉर्म असेल. आता शेवटी तुम्हाला एक छोटेसे काम करायचे आहे, की तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सीला पैसे द्यावे लागतील. यानंतर, तुम्हाला तुमच्या नावाने जारी केलेले हस्तांतरण कनेक्शन मिळेल. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही अगदी सहज तुमचे गॅस कनेक्शन हस्तांतरीत करू शकता.

Advertisement

अरे वा..आता ‘या’ पद्धतीने बुक करा गॅस बुकिंग; पहा, काय आहे नवीन पद्धत, जाणून घ्या अपडेट

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply