Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजारात या दिग्गज गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी, या शेअर्समध्ये केलीय गुंतवणूक..!

मुंबई : शेअर बाजारात गुंतवणुक करण्यासाठी अनेक जण इच्छूक असतात. मात्र, कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी, हे समजत नाही. काही जण एक्स्पर्टचे सल्ले घेतात, तर काही जण मोठ्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवून असतात. मोठ्या गुंतवणूकदारांना फॉलो करुन चांगले रिटर्न मिळवणे, हा त्यामागील हेतू असतो.

Advertisement

शेअर बाजारातील (Share Market Investers) ‘बिग बूल’ अर्थात राकेश झुनझुनवाला हे त्यापैकीच एक मोठे नाव. ते कोणत्या शेअर्सवर पैसे गुंतवतात, याकडे अनेकांचे लक्ष लागलेले असते. राकेश झुनझुनवाला यांच्यासह डोली खन्ना, आशिष कचोलिया आणि मुकुल अग्रवाल अशी काही मोठ्या गुंतवणुकदारांची नावे आहेत.

Advertisement

सप्टेंबरच्या तिमाहीत या मोठ्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात जोरदार खरेदी केली. या सर्व मोठ्या गुंतवणूकदारांनी नेमके कोणत्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले आहेत, याबाबत जाणून घेऊ या…

Advertisement

राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhujhunwala) यांनी त्यांच्या आवडत्या टायटन कंपनीत त्यांचा हिस्सा 0.1 टक्क्यांनी वाढविला आहे. बँक, मेटल आणि रिअल इस्टेट कंपन्या त्यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जोडल्या आहेत. कॅनरा बँक, नाल्को आणि इंडिया बुल्स रिअल इस्टेटच्या सार्वजनिक भागधारकांमध्येही त्याचे नाव दिसले. झुनझुनवाला यांनी मानधना रिटेलमधील (Mandhana Retail) स्टेक 5.35 टक्क्यांनी कमी करून 7.4 टक्के केला.

Advertisement

चेन्नईचे दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना यांचे नाव एनडीटीव्ही (NDTV)च्या पब्लिक शेअर होल्डर्समध्ये 1.1 टक्के स्टेकसह दिसले. दुसरीकडे मिड आणि स्मॉल कॅप स्टॉक्स खरेदी करणारे सुप्रसिद्ध गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरर फेज थ्री (FAze Three)चा समावेश केला.. त्यांच्या नवीन होल्डिंगमध्ये फेज थ्री तसेच एक्सप्रो इंडियाचा (Expro India) समावेश आहे. फेज थ्री त्यांची हिस्सेदारी 2.8 टक्के आणि एक्सप्रो इंडियामध्ये 2.5 टक्के आहे.

Advertisement

गुंतवणूकदार मुकुल अग्रवाल यांनी या काळात सर्वाधिक खरेदी केली. पारस डिफेन्स, एमटीएआर टेक्नॉलॉजीज, विधी स्पेशालिटी फूड, थॉमस कूक, ऑलकार्गो लॉजिस्टिक, जेट फ्रेट लॉजिस्टिक्स, रॅडिको खेतान, जोटा हेल्थकेअर, गोल्डियम इंटरनॅशनल या सार्वजनिक भागधारकांच्या यादीत त्यांचे नाव आले. या कंपन्यांमध्ये त्यांचा 1.1 ते 6.5 टक्के हिस्सा आहे.

Advertisement

बाब्बो.. पाकिस्तान मध्ये 150 रुपये किलो साखर; महागाईने नागरिकांची होरपळ; पहा, कशामुळे आलेय ‘हे’ संकट..?
‘त्या’ पराभवानंतर वेस्ट इंडिज संघास मोठा झटका; ‘या’ दिग्गज खेळाडूने जाहीर केली निवृत्ती

Advertisement
Advertisement

Leave a Reply