Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो… पेट्रोल आणायला लोकं चाललेत की नेपाळला; पहा, कुठे घडतोय ‘हा’ चमत्कारिक प्रकार

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की नागरिकांचे सगळे बजेट कोलमडले आहे. पेट्रोलनंतर डिझेलने सुद्धा शंभरी पार केली आहे. देशात अशी परिस्थिती असताना शेजारील नेपाळ या देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त मिळत आहे. त्यामुळे आपल्या भारतीय लोकांनी नवी आयडीया शोधून काढली आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण, नेपाळच्या जवळ असणाऱ्या उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांतील लोक पेट्रोल आणण्यासाठी चक्क नेपाळला जात आहेत. नेपाळ सरकारनेही 100 लिटरपर्यंत इंधन घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे.

Advertisement

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे नेपाळ आणि भारतातील इंधन दरात मोठा फरक पडला आहे. पेट्रोलच्या किमतीत 26 रुपये तर डिझेलच्या किमतीत 29 रुपयांचा फरक आहे. मिडीया रिपोर्टनुसार, नेपाळच्या सीमावर्ती भागातील लोक वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी नेपाळला जात आहेत. यामुळे केंद्र सरकार आणि बिहारमधील पेट्रोल पंपचालकांचे नुकसान होत आहे.

Advertisement

कोरोना महामारीच्या काळात नेपाळने आपल्या आंतरराष्ट्रीय बॉर्डर बंद केल्या होत्या. आता मात्र तब्बल दीड वर्षांनंतर बॉर्डर पुन्हा सुरू केल्या आहेत. त्यामुळे बिहार राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यांतील लोक आता वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी आता नेपाळमध्ये जात आहेत. नेपाळमध्ये भारताच्या तुलनेत स्वस्त पेट्रोल मिळत आहे. त्यामुळे लोक यासाठी नेपाळमध्ये जात आहेत. याआधीही असे प्रकार सुरू होते. आता मात्र देशातील तेलाच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे लोकांसमोरही दुसरा पर्याय नाही.

Advertisement

जागतिक बाजारात कच्च्या  तेलाच्या किमती वाढत असल्याने तेल कंपन्या सातत्याने भाव वाढ करत आहेत. असे असले तरी अन्य देशांमध्ये मात्र इंधन स्वस्त मिळत आहे. देशात मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर रोजच नवनवे रेकॉर्ड करत आहे.

Advertisement

 

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply