Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो..! महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या…वाचा नेमकं कारण…

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर भाजपाने पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांना क्लिन बोल्ड केले तर अँटेलिया जिलेटीन कांड्या आणि सचिन वाझे प्रकरणामार्गे शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपात तात्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांची विकेट पडली.

मुंबई : भाजपा महाविकास आघाडीला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. महाविकास आघाि9डीच्या मंत्र्यांच्या चुकांवर भाजप डोळ्यात तेल घालून नजर ठेवत आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ होत आहे.

Advertisement

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर भाजपाने पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांना क्लिन बोल्ड केले तर अँटेलिया जिलेटीन कांड्या आणि सचिन वाझे प्रकरणामार्गे शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपात तात्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांची विकेट पडली. त्यानंतर महाविकास आघाडीला घेरण्याची भाजपाने एकही संधी सोडली नाही.

Advertisement

भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यात सोमय्या म्हणाले की, दिवाळीपुर्वीच माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरूंगात जातील. त्यामुळे राज्यातील जनतेला दिवाळीपर्यंतही वाट पहावी लागणार नाही, तर त्यानंतर परिवहनमंत्री अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही कारवाई होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

Advertisement

टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलतांना किरीट सोमय्या यांनी सांगितले की, अनिल परब यांनी नोटीस पाठवून माफी मागायला सांगितली होती. मात्र माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असे सोमय्या म्हणाले. तर परीवहनमंत्री अनिल परब यांनीच राज्यातील 12 कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली. याचं कारण सांगतांना सोमय्या म्हणाले, लॉकडाऊन काळात परब यांनी स्वतःच्या मालकीचं रिसॉर्ट बांधण्यासाठी थ्री फेज एमएसईबीचं कनेक्शन घेतले. तसेच लॉकडाऊन असताना बेकायदेशीर लॉकडाऊन बांधत होते, त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

Advertisement

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करतांना सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी कारण त्यांच्या पत्नीच्या नावे 19 बेनामी बंगले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मला आणि माझ्या मुलाला दिलेल्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. तर मुख्यमंत्री हे घोटाळेबाजांच्या सरकारचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळे या आलीबाबा आणि चाळीस चोरांचा घोटाळा बाहेर काढणारचं असा इशारा त्यांनी दिला. तर किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांची तब्बेत लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना केली आहे. कारण सोमवारी मी कोल्हापुरला जाऊन त्यांनी उभारलेला बेनामी साखर कारखाना लोकांसमोर मांडणार आहे, असेही भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply