Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भन्नाटच की….! ATM मधून मिळणार औषधं आणि प्रेग्नंसी कीट…वाचा नेमकं कसं…

पैसे भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी आता एटीएमच्या उपलब्धीमुळे बँकेचे दार झिजवण्याची गरज उरली नाही. तसेच सट्टीच्या दिवशीही बँक बंद असल्या तरीही आपण एटीएमच्या माध्यमातून पैसे काढू शकतो.

दिल्ली : एटीएमने तासन् तास बँकेच्या रांगेत उभं राहण्याचं कष्ट वाचवत अगदी कमी वेळात आपल्याला हवे असलेले पैसे काढण्याची सोय करून दिली. त्यातून आपण आपल्या सोयीनुसार पैसे काढत असतो. आपण पैसे काढण्यासाठी आणि पुन्हा आपल्या खात्यात पैसे भरण्यासाठी एटीएमचा वापर करतो. त्यामुळे आपला बँकेत जाण्याचा त्राण वाचतो. त्याचप्रमाणे आता एटीएम मशीनमध्ये तुम्ही विचारही करू शकणार नाही अशा गोष्टी मिळणार आहेत.

Advertisement

पैसे भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी आता एटीएमच्या उपलब्धीमुळे बँकेचे दार झिजवण्याची गरज उरली नाही. तसेच सट्टीच्या दिवशीही बँक बंद असल्या तरीही आपण एटीएमच्या माध्यमातून पैसे काढू शकतो. त्याच एटीएममधून आता चक्क औषधं आणि प्रेग्नंसी कीटही मिळणार आहेत. त्यामुळे यापुढे मेडीकल जरी बंद असले तरी आता एटीएमच्या माध्यमातून औषध आणि प्रेग्नंसी कीटही मिळू शकणार आहेत. तर आपल्या देशात अशा प्रकारचे एटीएम मशीन सुरू करण्यात आले आहेत. तर देशातील प्रत्येक ब्लॉकमध्ये औषधांचे हे मशीन बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे भारताच्या दुर्गम भागातील नागरीकांनाही आता यापुढे 24 तास औषधं आणि प्रेग्नंसी कीट मिळू शकणार आहेत. तर देशभरातील 6 हजार ब्लॉकमध्ये हे मशीन बसवण्यात येणार आहेत.

Loading...
Advertisement

या एटीएम मशीनचा वापर करताना डॉक्टरांनी दिलेले प्रस्क्रिप्शन या मशीनमध्ये टाका आणि त्यानंतर ही औषधं उपलब्ध होऊ शकणार आहेत. तर यासाठी केंद्र सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटर आणि आंध्र प्रदेशातील एटीएमझेड ATMZ या संस्थेमध्येेे करार करण्यात आला आहे.  तर या एटीएममधून गर्भधारणा, कोरोना तपासणी, ऑपरेशन संबंधी लागणारे औषधं त्याचप्रमाणे वैद्यकीय उपकरणे आणि विविध प्रकारची औषधं एटीएममधून नागरीकांना मिळणार आहेत. तर संबंधीत एटीएममध्ये जेनेरिक औषधं ठेवण्याची शक्यता आहे. ज्यामुळे नागरीकांना जेनेरिक औषधं योग्य किमतीत मिळू शकतील. तसेच या एटीएमसाठी ई-कॉमर्स कंपन्या औषधांचा पुरवठा करणार आहेत. या एटीएममुळए नागरीकांना आता पैशांप्रमाणेच 24 तास औषधांचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे ही भन्नाट कल्पना लोकांसाठी फायद्याची ठरू शकते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply