Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

टोमॅटो 25 पैसे किलो, तर कारले 2 रुपये..! ‘बळी’राजाचा वाहतूक खर्चही निघेना, पाहा कुठे मिळाला हा ‘विक्रमी’ भाव..?

शेतकऱ्याला बळीराजा म्हटले जाते; पण या राजाचा कायमच ‘बळी’ गेला आहे. कधी सुका दुष्काळ, तर कधी ओला.. कधी रोगराई, तर मजुरांची टंचाई.. एवढ्या सगळ्या दिव्यातून पार पडले, तर बाजार समितीतील व्यापारी आहेतच लुटायला.. 

Advertisement

सध्याच्या महागाईच्या काळात 25 पैशाला काय मिळतं..? तुम्ही म्हणाल, 25 पैसे तर चलनातही दिसत नाहीत. पण आमच्या शेतकऱ्याचा माल तुम्हाला 25 पैशांतही मिळू शकतो. खरचं.. या बळीराजाची क्रूर चेष्टा सुरु आहे हो..!

Advertisement

आता हे सगळं सांगण्याचे कारण म्हणजे, पंढरपूरच्या बाजार समितीत झालेल्या लिलावात लाल भडक टमाट्याला 25 पैसे किलो, असा ‘विक्रमी’ भाव मिळालाय. मटार, फ्लॉवर सोडले, तर इतर सर्वच भाज्यांचे दर कोसळले. सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचे सांगते, पण कसे होणार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट..?

Advertisement

पंढरपूर बाजार समितीत 20 किलो टोमॅटोचे कॅरेट 5 रुपयांना विकले गेले, म्हणजे 25 पैसे किलो दर टोमॅटोला मिळाला, तर 15 किलो कारल्याच्या पिशवीला 30 रुपये किलो दर मिळाला. बहुतांश भाज्यांना 25 पैसे ते 5 रुपयांपर्यत दर मिळत आहे.

Loading...
Advertisement

लॉकडाऊन आणि आवक वाढल्याने भाज्यांचे दर गडगडल्याचे अडते मकसूद बागवान यांनी सांगितले. भाज्यांचे दर कमालीचे उतरल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला बाजारात विक्रीस आणण्याऐवजी जनावरांना चारा म्हणून वापरण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

बाजारात भाजी आणली, तर वाहतूक खर्चदेखील भागत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पावसाचा अवसानघातकीपणा आणि बाजारपेठेतील दराची अशी अवस्था त्यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.

Advertisement

सोप्पंय की.. कार घ्यायला मिळेल मग मोठीच सूट; फ़क़्त गरज आहे ‘त्या’ सर्टिफिकेटची..!
अर्र.. म्हणून शेतकऱ्याने ढोबळी वाटली फुकट; वाचा राहुरीची दुर्दैवी ‘बेकायदेशीर कृत्या’ची शेतीकथा

Advertisement
Advertisement

Leave a Reply