Take a fresh look at your lifestyle.

डिझायनर ‘5G स्मार्टफोन’ येतोय.. ‘ब्रँडेड टोस्टर’ बनविणारी ‘ही’ कंपनी करणार उत्पादन

नवी दिल्ली : ब्रेड भाजायचा ‘ब्रँडेड टोस्टर’ (Branded Toaster) साधारण चार-पाच हजार रुपयांत मिळतो; पण जपानच्या एका कंपनीच्या टोस्टरची किंमत कितीय माहिती का? तब्बल 329 डॉलर, म्हणजे भारतीय चलनानुसार सुमारे 25 हजार रुपये.

Advertisement

बाल्मुडा (Balmuda) असे या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी लक्झरी (Luxury) श्रेणीतल्या घरगुती उपकरणांची निर्मिती करुन जगभरातल्या निवडक बाजारपेठांत त्याची विक्री करते. त्यात सर्वाधिक लोकप्रिय आहे, तो त्यांचा ‘टोस्टर’. आकर्षक डिझाइनमध्ये उपकरणे बनविणारी ही कंपनी आता ‘स्मार्टफोन’ (Smartphone) निर्मिती करणार आहे.

Advertisement

बाल्मुडा कंपनी 5G स्मार्टफोन तयार करणार आहे. उत्पादन निर्मितीसाठी या कंपनीने जपानमधल्या कायोसेरा (Kyocera) या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीशी, तर विक्रीसाठी सॉफ्ट बँक (Soft Bank) कंपनीशी करार केला आहे.

Advertisement

बाल्मुडा कंपनीने या फोनची अंदाजे किंमत सांगितलेली नाही; मात्र ज्या कंपनीचा टोस्टरसाठी 25 हजार रुपये लागतात, तर स्मार्टफोन किती किमतीचा असेल, ते बोलायलाच नको. बाल्मुडा कंपनी टोस्टर अद्याप भारतात विकत नाही; पण त्या टोस्टरच्या फोटोजवरून त्याच्या डिझाइनचा आणि कार्यपद्धतीचा अंदाज बांधता येतो.

Advertisement

‘प्रीमिअम डिझाइन फिलॉसॉफी’ हेच मूलभूत तत्त्व अॅपल (Apple) कंपनीने ठेवलं. आज जगातल्या सर्वांत प्रभावी कंपन्यांपैकी ती एक आहे. डायसन ही कंपनीदेखील महागडी घरगुती आणि पर्सनल केअर उपकरणं बनवते. त्यात आता ‘बाल्मुडा’ कंपनीचाही समावेश होणार आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply