Take a fresh look at your lifestyle.

रामदेव बाबांनी विकली पतंजली बिस्कीट कंपनी, ‘इतक्या’ रुपयांना झाला सौदा?

नवी दिल्ली : योगगुरू म्हणून ओळख असणाऱ्या बाबा रामदेव यांनी ‘पतंजली’च्या माध्यमातून आयुर्वेद व्यवसायात आपले चांगलेच बस्तान बसविले आहे. मात्र, सध्या ‘पतंजली’ही अडचणीत आली आहे. कारण, रामदेव बाबा यांनी आपली पतंजली बिस्कीट कंपनी (Patanjali Biscuit’s business) विकण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

भारतातील खाद्यतेलांची सर्वाधिक उत्पादन करणारी रुचि सोया (Ruchi Soya) कंपनी लवकरच बाबा रामदेव यांच्या पतंजली बिस्किटांचा व्यवसाय खरेदी करणार आहे. रुचि सोया इंडस्ट्रीजने पतंजली नॅचरल बिस्किट प्रायव्हेट लिमिटेड (PNBPL) सोबत 60.02 कोटींचा करार केला. त्यात व्यवसाय हस्तांतर करारावर (BTA) स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली आहे. पुढील दोन महिन्यांत हे अधिग्रहण पूर्ण होईल.

Advertisement

भारतातील रुचि सोया उत्पादन सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे. न्यूट्रिला, महाकोश, रुची गोल्ड, रुचि स्टार आणि सनरिक यांसारखी उत्पादने ही कंपनी तयार करते. एके काळी रुचि सोया कंपनीही कर्जात बुडाली होती. त्यामुळे पंतजली आयुर्वेदने 2019 मध्ये ती खरेदी केली होती. यासाठी स्वत: पतंजली यांना 3200 कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे लागले होते.

Advertisement

दरम्यान, आता सोया कंपनीने पतंजली बिस्कीट विकत घेतले आहे. त्यांच्यातील करारामुळे ‘एफएमसीजी’ क्षेत्रात आपली स्थिती मजबूत करण्यास मदत होईल, असे रुचि सोया इंडस्ट्रीजचे म्हणणे आहे. प्रतिस्पर्धी व्यवस्थेसाठी रुची सोया आणि पीएनबीपीएलमधील हा करार आहे. त्याअंतर्गत, पतंजली आयुर्वेद लिमिटेडसह पीएनबीपीएल आणि त्याच्याशी संबंधित कंपन्या थेट बिस्किट्सच्या कोणत्याही स्पर्धात्मक व्यवसायात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रवेश करू शकत नाहीत.

Advertisement

करारा अंतर्गत देय रक्कम दोन हप्त्यांमध्ये दिली जाणार आहे. पहिला हफ्ता 15 कोटींचा एकूण खरेदीचा विचार देय म्हणून अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी केला जाईल, तर उर्वरित 45.01 कोटी रुपयांचा हफ्ता 90 दिवसांत देण्यात येईल. पीएनबीपीएलची उलाढाल वर्ष 2019-20 मध्ये 448 कोटी रुपये आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply