Take a fresh look at your lifestyle.

हाणा चमचमीत..! तेलाची धार स्वस्त होतेय, पहा मोदी सरकारचा प्लॅन..!

मुंबई : कोरोनाचे संकट, त्यात महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल झाले. खाद्यतेलाचा विचार केला, तरी गेल्या वर्षभरात तेलाच्या किरकोळ किंमती 55.55 टक्क्यांनी वाढल्या. त्यामुळे गृहिणीचे बजेट कोलमडले. तेलाविना भाज्या करण्याची वेळ आली. मात्र, आता देशात तेलाच्या वाढत्या किंमती लक्षात घेता, मोदी सरकारने विशेष योजना आखली आहे. त्यानुसार, लवकरच खाद्यतेलांच्या किंमती (edible oils price) कमी होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारने काय योजना आखली आहे, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतीबाबत केंद्रातील अन्न सचिव सुधांशु पांडे म्हणाले, की कोविडमुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने कांडला आणि मुंद्रा बंदरांवर तेलाचा मोठा स्टॉक अडकला आहे. कोविडमुळेच सर्वसाधारण विविध एजन्सीद्वारे घेतल्या गेलेल्या चाचण्यांशी संबंधित मंजूरीला उशीर झाला आहे. सीमाशुल्क आणि अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) कडे ही समस्या सोडविली गेली आहे. हा स्टॉक बाजारात येताच खाद्यतेलाच्या किंमती खाली येण्याची अपेक्षा आहे.

Advertisement

खाद्यतेलाचे उत्पादन कमी होत असल्याने, गरज भागविण्यासाठी देश आयातीवरच अवलंबून आहे. देशात दरवर्षी 75,000 कोटी रुपयांचे खाद्यतेल आयात करावे लागते.

Advertisement

यंदा 8 मे रोजी भाजीपाल्याचे किरकोळ दर 55.55 टक्क्यांनी वाढून 140 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत, त्या तुलनेत एक वर्षापूर्वीच्या याच कालावधीत ते 90 रुपये प्रतिकिलो होते. त्याचप्रमाणे पाम तेलाची किरकोळ किंमत 51.54 टक्क्यांनी वाढून 132.6 रुपये प्रतिकिलोवर गेली आहे, त्याआधी 87.5 रुपये प्रतिकिलो, सोया तेल 50 टक्क्यांनी वाढून 158 रुपये प्रतिकिलोवर राहिला आहे, जो 105 रुपये प्रतिकिलो होता. तसेच मोहरीच्या तेलाचे दर 49 टक्क्याने वाढून ते 163.5 रुपये प्रतिकिलो झाले, जे पूर्वी 110 रुपये प्रतिकिलो होते.

Advertisement

सोयाबीन तेलाचीही किंमत वाढली
सोयाबीन तेलाची किरकोळ किंमतही या काळात 37 टक्क्यांनी वाढून 132.6 रुपये प्रतिकिलोवर गेली आहे, जी पूर्वी 87.5 रुपयांवर होती. शेंगदाणा तेलाचा दर 38 टक्क्यांनी वाढून 180 रुपये प्रति किलो झाला आहे. जो पूर्वी 130 रुपये प्रति किलो होता.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply