Take a fresh look at your lifestyle.

इंदोरीकर महाराजांमागचे शुक्लकाष्ठ हटेना, बघा बॉ.. आता काय झालंय..?

अहमदनगर : प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती देशमुख (इंदोरीकर महाराज) यांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ काही केल्या संपताना दिसत नाही. सम-विषम तारखेला होणाऱ्या पुत्रप्राप्तीच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे काही दिवसांपूर्वी महाराज अडचणीत आले होते. संगमनेर न्यायालयात (Sangamner Court) त्यांच्याविरुद्ध बरेच दिवस खटलाही चालला. अखेर संगमनेर न्यायालयाने त्यांना दिलासा देताना, खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.

Advertisement

आता पुन्हा एकदा इंदोरीकर महाराज यांच्या अडचणी वाढत असल्याचं दिसत आहे. संगमनेर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यावर आता ‘अंनिस’ने (अंधश्रद्धा निर्मूलन समिती) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad bench of Mumbai High Court) याचिका दाखल केली आहे.

Advertisement

संगमनेर न्यायालयाने इंदोरीकर महाराज यांची निर्दोष मुक्तता केल्यावर या निर्णयाविरुद्ध अंधश्रद्धा निर्मुलन समितीने औरंगाबाद खंडपीठात इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात पुन्हा याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात इंदोरीकर महाराजांसह सरकारी पक्षालाही प्रतिवादी केले आहे. ‘अंनिस’च्या राज्य सचिव, तसेच याचिकाकर्त्या रंजना गवांदे यांनी यासंदर्भात माहिती दिली. या याचिकेमुळे इंदोरीकर महाराज यांच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसत आहे.

Advertisement

इंदोरीकर महाराज यांनी काही महिन्यांपूर्वी पुत्रप्राप्ती संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ‘स्री संग सम तिथीला केल्यास मुलगा, तर विषम तिथीला केल्यास मुलगी होते..’ असे वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी एका कार्यक्रमात केले होते. या वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात ‘अंनिस’ने संगमनेर दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती.

Advertisement

इंदोरीकर महाराजांनी संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराज कसे दोषी आहेत, याची बाजू कोर्टात मांडली. तर इंदोरीकर यांची बाजू त्यांच्या वकिलांनी मांडली. अखेर संगमनेर न्यायालयाने इंदोरीकर महाराजांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply