Take a fresh look at your lifestyle.

कोरोनामुळे जॉब गेलाय, ‘इथे’ काम करून मिळवा मोक्कार पैसा..!

मुंबई : कोरोना संकटात अनेक उद्योगधंदे बंद पडले. त्यातून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. बेरोजगार झाल्याने रोजच्या जगण्या-मरणाचाच प्रश्न उभा राहिला. मात्र, नोकरी गेली असली तरी काळजी करण्याचे कारण नाही. कारण, तुमच्याकडे जर कौशल्य असेल, तर तुम्ही कधीही रिकामे राहू शकत नाही. जॉब नाही, म्हणून रडत बसण्यापेक्षा तुम्ही काय करू शकता, तुमच्यात दडलेली कौशल्ये ओळखा, त्यानुसार काम सुरु करा.. अनेक संधी उपलब्ध आहेत, त्याचा शोध घ्या.. आज आपण घरबसल्या रग्गड पैसा मिळवून देणाऱ्या कामाची माहिती घेणार आहोत.

Advertisement

ऑनलाइन विक्री (Online Selling)
सध्या ऑनलाइन खरेदी-विक्रीची ‘फॅशन’ आहे. एखाद्या ‘ई-कॉमर्स’ (E- commerce) कंपनीसोबत ‘टायअप’ करून त्या माध्यमातून उत्पादनांची विक्री करू शकतो. मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांचे नेटवर्क जबरदस्त असत. त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.

Advertisement

फ्री-लान्सर (Freelancer, Consultant)
व्यावसायिक वा ठराविक वेळेत तुम्हाला काम करायचं नसेल, तर ‘फ्रीलान्सिंग’ (Freelancing) आणि कन्सल्टिंग (Consulting) हा एक चांगला पर्याय आहे. सध्या ‘फ्रीलान्सिंग’चा व्यवसायसुद्धा वाढत आहे. तुम्ही डिझायनिंग, लेखन, ब्लॉग एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग, प्रूफ रिडिंगशिवाय इतरही अनेक ऑनलाइन कामे करू शकता.
तसेच, कन्सल्टंट म्हणून तुम्ही काम करू शकता. एखाद्या क्षेत्रात जाणकार असाल, तर त्याबाबत सल्ला देण्याचे काम करू शकता.

Advertisement

ब्लॉगर (Blogger)
सध्याच्या काळात ‘ब्लॉगर्स’ची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. विशेष म्हणजे, वेगवेगळ्या विषयावर नाविण्यपूर्ण कल्पना मांडणाऱ्या ब्लॉगर्सना चांगल्या संधी मिळत आहेत. यातून तुम्ही आर्थिक उत्पन्नही मिळवू शकता. युजर्स आणि त्यांना हवा असलेला उत्तम, माहितीपूर्ण कंटेटं दिल्यास ‘एंगेजमेंट’ वाढेल. पैसेही मिळतील.

Advertisement

मार्केटिंग (Marketing)
इतर कंपन्यांची प्रोडक्ट विकून तुम्ही पैसे कमावू शकता. कंपन्यांकडून त्यांच्या प्रोडक्टची विक्री करण्यासाठी कमिशन दिलं जातं. त्यातून तुम्ही आर्थिक उत्पन्न मिळवू शकता.

Advertisement

युट्यूब, इन्स्टाग्राम (YouTube Channel, Instagram)
युट्यूब चॅनेल, इन्स्टाग्रामसुद्धा पैसे मिळवण्याचं एक चांगलं साधन आहे. तुम्ही स्वत:चं युट्यूब चॅनेल सुरु करू शकता. त्या माध्यमातून ‘सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर’ म्हणून काम करता येईल. आता सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply