दुर्दैवी घटना : ‘त्या’ होमिओपॅथिक औषधाचा सल्ला पडला महाग; दारूमध्ये पिल्याने झाला 7 जणांचा मृत्यू..!
विलासपूर : छत्तीसगड राज्यात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. करोना विषाणूची बाधा होऊन कोविड 19 आजार होऊ न देण्याच्या उद्देशाने थेट मोहाच्या दारूमध्ये होमिओपॅथिक औषध पिल्याने सातजणांचा मृत्यू झाला आहे. गावोगावी आणि गल्लोगल्ली आम्हीच करोनावर औषध आणल्याचा दावा करणाऱ्या अनेकांच्या सल्ल्यामुळे नेमके काय होऊ शकते याचेच हे दुर्दैवी उदाहरण आहे.
या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून आणखी पाचजण गंभीर आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार चालू आहेत. बिलासपूरच्या चीफ मेडिकल ऑफिसर (सीएमओ) यांनी याबाबत सांगितले आहे की, होमिओपॅथिक औषध हे दारूबरोबर पिण्याचे मुख्य कारण या मृत्यूचबाबत असू शकते. तरुणांनी मोहाच्या दारूत ड्रॉसेरा 30 नावाचे औषध प्याले होते. औषधात 91 टक्के अल्कोहोल आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी वैद्यकीय पथक तपास करत आहे.
या तरुणांना अशा पद्धतीने औषध पिण्याचा सल्ला नेमका कोणी दिला होता याचाही तपास केला जात आहे. मंगळवारी सायंकाळी या तरुणांनी नशा करण्याच्या निमित्ताने होमिओपॅथिक खोकल्याच्या सिरपमध्ये महुआ दारू पिऊन घेतली. यानंतर सर्व आपापल्या घरी गेले. रात्री त्यांची तब्येत खालावली. प्रत्येकाला उलट्या होऊ लागल्या. बुधवारी पहाटेपर्यंत 4 तरुणांचा घरात मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून गावातले तरुण कोरोना औषध म्हणून होमिओपॅथिक सिरप पित असल्याची माहितीही मिळाली आहे. दारूमध्ये हे औषध मिसळल्याने कोरोना रोखण्याची शक्यता ग्रामस्थांना वाटत होती. या गैरसमजांमुळे तरुण गेल्या काही दिवसांपासून गावात त्याचा वापर करीत होते. त्यामुळेच हे आठजण मृत्यू पावल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
संपादन : माधुरी सचिन चोभे
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
- IND vs ENG: रोहीतला दिलासा..! T20 मालिकेत विराटची जागा घेणार ‘हा’ स्फोटक फलंदाज
- Eknath Shinde: दाऊद प्रकरणात एकनाथ शिंदेंचा मोठा आरोप; म्हणाले,राष्ट्रवादीमुळे..
- Relationship tips: मुलींना आवडते मुलांच्या ‘या’ सवयी! जाणुन घ्या ‘त्या’ बद्दल सर्व काही
- Man’s health: पुरुषांनी लोणचे जास्त का खाऊ नये?; धोका वाढण्यापूर्वी जाणून घ्या सत्य
- Maruti: अर्र.. अनेकांना धक्का देत मारुतीने घेतला मोठा निर्णय; सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय कार केली बंद